पोस्ट्स

एप्रिल ३०, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्र दिन व कामगार दिन संगमेश्वर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात.

इमेज
सोलापूर प्रतिनिधी ( दिनांक १ मे २०२३ ) महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस,  संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त ) मध्ये मोठ्या उत्साहात साजरा  साजरा झाला. प्रारंभी मान्यवरांचे मैदानावर आगमन झाले.त्यानंतर तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.  प्राचार्य राजेंद्र देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. उपस्थितांना प्राचार्यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. याप्रसंगी उपप्राचार्य वंदना पुरोहित, डी.एम. मेत्री, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास गोठे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रसाद कुंटे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.मेजर चंद्रकांत हिरतोट यांनी सूत्रसंचालन केले.