क्षेत्रभेटीअंतर्गत नव्या स्टार्टअप चा अनुभव घेतला संगमेश्वर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी
सोलापूर ता. 13 : संगमेश्वर कॉलेजच्या भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी कोठारी पाईप्स, पार्ले जी कंपनी व बोडके फार्म रोपवाटीकेस भेट देऊन कार्यपद्धतीची माहिती घेतली. क्षेत्रभेट अभ्यास अंतर्गत भूगोल विभागाकडून कोठारी पाईप, यावली, मोहोळ, पार्ले-जी कंपनी, बोडके कृषी फार्म व रोपवाटिका वडवळ फाटा यांना भेट देण्यात आली. ज्याप्रमाणे सहशालेय उपक्रम असतात त्याप्रमाणे महाविद्यालयीन जीवनामध्ये क्षेत्रभेटीचा उपक्रम भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांना नेमलेला असतो. त्यानुसार शेती, उद्योग, व्यापार, कृषीपूरक व्यवसाय या क्षेत्रातील नव उद्योजकांना भेटून माहिती घेणे. त्यांच्याशी संवाद साधणं हा उद्देश या क्षेत्रभेटी अंतर्गत असतो. क्षेत्रभेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य मिळावे त्यातून विषयाशी निगडित असलेल्या उद्योग आणि नोकरीच्या संधी कोणत्या आहेत याचे आकलन व्हावे हा प्रमुख हेतू या अभ्यासक्रमामागे आहे. कोठारी पाईप्स यावली- मोहोळ या कंपनीला दिलेल्या भेटीमध्ये शेतीमधील जलसिंचनाच्या नवनवीन पद्धती याविषयी माहिती वि...