कोणत्याही क्षेत्रातल्या करिअरला खेळाने बळकटी प्राप्त होते. - डॉ. राजेंद्र देसाई
राष्ट्रीय क्रीडा दिन संगमेश्वर मध्ये उत्साहात सोलापूर ( दि. २९ ) ''आपल्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ काढणे आणि तंदुरुस्त आणि सक्रिय राहण्यासाठी एखाद्या खेळात गुंतून राहणे महत्वाचे आहे. दीर्घ आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी, व्यक्ती मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे महत्वाचे आहे. ते केवळ खेळांमुळे शक्य आहे. कोणत्याही क्षेत्रातल्या करिअरला खेळाने बळकटी प्राप्त होते.असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र देसाई यांनी केले. ते ष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने संगमेश्वर कॉलेजच्या मैदानावर आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास गोठे, संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य प्रियांका समुद्रे शारीरिक शिक्षण संचालक आनंद चव्हाण आदी उपस्थित होते. विविध क्रीडा स्पर्धा मैदानावर संपन्न झाल्या. निकाल - अंतिम निकाल 14 वर्षाखालील संगमेश्वर पब्लिक स्कूल सूर्यनमस्कार प्रथम मयूर यादव द्विती...