आजच्या स्त्रियांनी सावित्रीबाईंचा आदर्श घ्यावा- डॉ. अंजना गायकवाड
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ' वाचन संकल्प महाराष्ट्राचा ' अंतर्गत लेखक वाचक संवाद उपक्रम एनएसएस व ग्रंथालय विभाग च्या वतीने आयोजन सोलापूर: भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या आहेत. त्यांनी आपल्या विचार कार्यातून समाजासमोर आदर्श निर्माण केलेला आहे. त्यामधील अग्रगण्य नाव म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले होय. भारतीय स्त्रियांच्या सामाजिक गुलामगिरीचे प्रमुख कारण त्यांचे अज्ञान आहे. ते दूर करण्यासाठी शिक्षण हा एकच पर्याय असून स्त्रियांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य जोतिराव व सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानी केले. याचा आदर्श आजच्या स्त्रियांनी घ्यावा. असे विचार सुप्रसिद्ध निवेदिका व कवयित्री डॉ. अंजना गायकवाड यांनी व्यक्त केले. संगमेश्वर कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम व ग्रंथालय विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित लेखक - वाचक संवाद व क्रांतिज्योती सावित्रीबाई ...