राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालय वक्तृत्व स्पर्धेत दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशनचे श्रेया माशाळ विजेती
कर्मयोगी कै.अप्पासाहेब काडादी यांची ११५ वी जयंती सोलापूर (दिनांक १३) दैनिक संचार प्रबोधन मंच,संगमेश्वर कॉलेज ( स्वायत्त )आणि कर्मयोगी अप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या ११५ व्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा काल संपन्न झाली. या स्पर्धेत दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशनची श्रेया प्रभाकर माशाळ हिने प्रथम क्रमांक पटकावला. प्रारंभी संगमेश्वर कॉलेजमध्ये उदघाटन सत्रात सकाळी ८.४५ वाजता कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांना अभिवादन करून यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. त्यानंतर दीप प्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य प्रा.डॉ.शंकर नवले यांच्या हस्ते झाले.उपसंपादक प्रशांत जोशी यांनी या सत्राचे प्रास्ताविक केले. संतोष पवार यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला. यावेळी बोलताना त्यांनी कर्मयोगी अप्पासाहेब यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौ...