स्त्रियांनी खंबीरपणे अभिव्यक्त व्हावे – समीर गायकवाड
संगमेश्वरमध्ये मराठी वाङ् मय मंडळाचे उद्घाटन सोलापूर प्रतिनिधी ''आजच्या काळात स्त्रियांचे प्रश्न अधिक गंभीर बनत चालले आहेत. त्यांचे जीवन नवनवीन समस्यांनी बाधित झालेले आहे. स्त्रियांचे शोषण, त्यांच्यावरील अन्याय अत्याचारांच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. यासाठी स्त्रीने शिक्षित, सजग व जागृत होणे खूप गरजेचे आहे. त्याबरोबरच आपल्यावरील कोणत्याही प्रसंगाला खंबीरपणे तोंड देत, आपल्यावरील अन्यायाविरुध्द अभिव्यक्त झाले पाहिजे. त्याशिवाय पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रीला सन्मान मिळणार नाही.'' असे विचार प्रख्यात लेखक समीर गायकवाड यांनी मांडले. संगमेश्वर कॉलेजमधील मराठी विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ मधील मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला शाखेचे उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख सुहास पुजारी होते. गायकवाड यांनी स्त्रीजीवन आणि माझे लेखन या विषयाव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय समाजजीवनातील स्थान आणि त्याला उजागर करणा-या साहित्याचे चिंतन मांडताना व्यक्त् केले. भारतीय समाजात सातत्याने स्त्रीजीवनाला दुय्यम स्थान ...