पोस्ट्स

सप्टेंबर २७, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वरमध्ये जागतिक पर्यटन दिन साजरा

इमेज
पर्यटन क्षेत्राला बळकटी मिळावी या उद्देशाने २७ सप्टेबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. जगभर पर्यटन विकास अत्यंत वेगाने होत असून लोकांना मिळणाऱ्या सुट्यांच्या काळात वाढ झाली असून आर्थिक आवकही वाढत आहे. शिक्षण, निवास व्यवस्था व वाहतूक सुलभ झाल्याने पर्यटन विकासाला अमर्याद संधी आहे असे विचार इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे यांनी मांडले. संगमेश्वर कॉलेजमध्ये भूगोल विभागाच्या वतीने जागतिक पर्यटन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कोकणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूगोल विभागप्रमुख डॉ. राजकुमार मोहरकर होते.  पुढे कोकणे म्हणाले की,'' प्रत्येकाने किमान १० गडकिल्ले सर करावे. पर्यटन करत असताना ते पर्यावरण पूरक असावे. पर्यटनात स्थानिक लोकांना व त्यांच्या सेवांना महत्व द्यावे. सोलापूर जिल्हा हा देखील अनेक पर्यटन स्थळांनी समृद्ध असून त्याचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. पर्यटनाच्या माध्यमातून सोलापूरात उत्पादित होणारे चादर, टॉवेल, कडक भाकरी, शेंगा चटणी या उत्पादनाचा प्रचार व प्रसार करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करता येतात.'' कायर्क