पोस्ट्स

जुलै १६, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

इमेज
अभ्यासासोबत कॉलेजच्या नावीन्यपूर्ण उपक्रमात सहभागी व्हा.                                                                                                 -   उपप्राचार्य प्रसाद कुंटे   सोलापूर ( दिनांक १५ जुलै ) " विद्यार्थ्यांनो आजपासून आपले शैक्षणिक सत्र सुरू होत आहे , त्या निमित्ताने कॉलेजकडून आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि मनःपूर्वक शुभेच्छा.   कला , वाणिज्य आणि विज्ञान शाखेत आपल्या अभ्यासासोबत कॉलेजच्या नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी व्हा आणि आपलं बहुआयामी व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी सज्ज व्हा. '' असे आवाहन उपप्राचार्य   प्रसाद कुंटे यांनी केले. ते कला आणि वाणिज्य शाखेच्या स्वागत समारंभ कार्यक्रमात बोलत होते. मंचावर कला शाखा समन्वयक    शिवशरण दुलंगे , वाणिज्य शाखा समन्वयक बसय्या हणमगाव उपस्थित होते.   प्रारंभी संगमेश्वर गीत झाले. त्यानंतर विभाग प्रमुखांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकानंतर   उपप्राचार्यांचा सत्कार झाला . त्यानंतर   चित्रफितीच्या माध्यमातून रूपाली पाटील ( वाणिज्य विभाग ) कोमल कोंडा (कला शाखा )यांनी   कॉलेजच्या विविध उपक्रमांची माहिती विभागनिहाय