पोस्ट्स

डिसेंबर २८, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वरचे माजी विद्यार्थी डॉ. विनायक काळे यांची फॉरेन यंग असोसिएटपदी निवड

इमेज
  संचार प्रतिनिधी सोलापूर, दि. २७- येथील डॉ. विनायक स्वामीराव काळे यांची 'महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्स २०२४' च्यावतीने रसायनशास्त्र विषयातील 'फॉरेन यंग असोसिएट' साठी निवड करण्यात आली आहे. या निवडीचा सत्कार सोहळा पुणे येथील 'महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' येथे पार पडला. संस्थेचे प्रेसिडेंट जी. डी. यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. काळे यांच्या 'सिन्थेसिस ऑफ नॅनोमटेरिअल्स फॉर एनर्जी रिलेटेड अॅप्लिकेशन्स या संशोधन कार्यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य स्तरावरून ही निवड केली जाते. आतापर्यंत जागतिक दर्जाच्या विविध नामांकित जर्नल्समध्ये त्यांच्या संशोधन कार्याचे अनेक पेपर्स प्रसिद्ध झाले आहेत व ते जगभरात वाचले व संधार्थिले जातात. भारतातील व जगभरातील विविध नामांकित विद्यापीठात त्यांनी संशोधनाचे काम केले आहे. त्यांच्या संशोधन कार्याची सुरवात नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथून झाली. त्यानंतर ते सिंगापूर येथील जगप्रसिद्ध न्यानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी येथे कार्यरत होते. पुढे सेऊल नॅशनल युनिव्हर्सिटी, दक्षिण कोरिया येथून न...