पोस्ट्स

डिसेंबर २२, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विज्ञान प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन मिळते ----- राहुल बुऱ्हाणपुरे

इमेज
 वालचंदच्या ओंकार लांगळेच्या उपकरणास प्रथम क्रमांक    सोलापूर ( दिनांक 22  )"विज्ञान प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन मिळते; महाविद्यालयीन जीवनात अशा  प्रकल्प प्रदर्शनातून  नक्कीच उद्याचे  संशोधक घडतील असा विश्वास वाटतो '' असे मत टाटांच्या गाड्यांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी ऑटोमोबाईल पार्ट बनवणारे सोलापूरचे युवा संशोधक राहुल बुऱ्हाणपुरे यांनी  व्यक्त केले. ते सायन्स सेंटर सोलापूर आणि संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात संगमेश्वर कॉलेजमध्ये बोलत होते. याप्रसंगी मंचावर प्राचार्य  ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, परीक्षक ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ प्राचार्य जे. डी. जाधव, प्रा.धनंजय शहा, प्रा. पी. ए. येळेगावकर , प्रा.डॉ.नागेश नकाते आदी मान्यवर उपस्थित होते.  प्रारंभी दीप प्रज्वलनानंतर  प्रमुख पाहुण्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. त्यानंतर राहुल बुऱ्हाणपुरे यांचे मनोगत झाले . त्यानंतर  कृषी हवामान शास्त्रज्