पोस्ट्स

ऑगस्ट २५, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा

इमेज
विज्ञान मंडळाच्या वतीने संगमेश्वर कॉलेजमध्ये उपक्रम  सोलापूर प्रतिनिधी --- संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग, विज्ञान मंडळ यांच्या वतीने राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त पोस्टर प्रेसेंटेशन  स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचे उदघाटन पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे यांच्या हस्ते झाले. परीक्षक डॉ. महेंद्र कावळे  ( वरिष्ठ महाविद्यालयातील भौतिकशाश्त्राचे प्राध्यापक ) यांनी पोस्टर्सचे परीक्षण केले.या पोस्टर  प्रेसेंटेशनामध्ये अंतराळ विषयी आणि खगोल शास्त्र विषयी विविध पोस्टर्स विद्यार्थ्यांनी तयार करून त्याची माहिती महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना दिली.                कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान मंडळ प्रमुख सुभाष पाटील सर,  प्रशांत शिंपी,  प्रशांत पाटील सर, प्रियांका पाटील यांनी परिश्रम घेतले.यावेळी विज्ञान समन्वयक श्री विशाल जत्ती  यांच्यासोबत सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संगमेश्वर कॉलेजचे कुस्ती स्पर्धेमध्ये यश

इमेज
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोलापूर महानगरपालिका आयोजित शालेय शहरस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजचा  खेळाडूंनी यश संपादन केले समर्थ  80 किलो मध्ये प्रथम, ओंकार कांगरे 72 किलो मध्ये प्रथम, दक्ष काशेकर 70 किलो मध्ये द्वितीय, ऋषी केंभावी 110 किलो मध्ये प्रथम, आदर्श मस्के 65 किलो मध्ये प्रथम क्रमांक पटकावून यश संपादन केले         या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते व प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन  धर्मराज काडादी ,सचिवा ज्योती  काडादी, प्राचार्य  डॉ .ऋतुराज बुवा, उपप्रचार्य प्रा.प्रसाद कुंटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले  फोटोओळी  कुस्ती खेळाडू समवेत प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, शैक्षणिक सल्लागार डॉ. पी एम दर्गोपाटील ,उपप्राचार्य प्रा.  प्रसाद कुंटे,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संतोष खेंडे व प्रा. विक्रांत विभूते

संगमेश्वर महाविद्यालयातील वाङमय मंडळ स्पर्धेत जैद हसन आणि ऋचा साळुंखेचे यश

इमेज
संचार प्रतिनिधी सोलापूर, दि. २३-  संगमेश्वर महाविद्यालय मराठी विभागाच्यावतीने मराठी वाङमय मंडळ आयोजित मराठी काव्यवाचन, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेत कला शाखेतील विद्यार्थी जैद हसन यांनी प्रथम क्रमांक पटकावला.  बीसीएच्या विद्यार्थिनी ऋचा साळुंखे यांनी काव्यवाचनात द्वितीय व वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. इतर विजेते पुढीलप्रमाणे. मराठी काव्यवाचन : तृतीय- गायत्री मेट्रे, कथाकथन : द्वितीय- अश्विनी विजापुरे, तृतीय- नंदिनी खाडे, वक्तृत्व : द्वितीय- प्रथमेश गरुड.                            या स्पर्धेतील विजेत्यांना महाविद्यालयाचे सल्लागार डॉ. प्रमोद दर्गोपाटील, प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी, डॉ. सारीपुत्र तुपेरे, परीक्षक प्रा. संघप्रकाश दुड्डे, डॉ. मंजू संगेपांग तसेच प्रा. रेश्मा सुर्वे व प्रा. सागर सुरवसे यांच्या उपस्थितीत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.  सर्व स्पर्धांचे उ‌द्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी संगमेश्वर महाविद्यालयाची उज्ज्वल परंपरा सांगितली. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा म्हणून