नाट्यकलेतून विद्यार्थ्यांचे परिपूर्ण व्यक्तिमत्व घडते - प्रा. ममता बोलली
सांस्कृतिक विभागाच्या वतीने संगमेश्वरमध्ये व्याख्यान सोलापूर दिनांक १७ १४ विद्या आणि ६४ कलापैकी नाट्यकलेच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्व घडतं. म्हणून महाविद्यालयीन जीवनात सांस्कृतिक विभागांमध्ये जे उपक्रम चालतात त्यात हिरहिरीने सहभागी व्हा. मनापासून काम करा .उत्तम कामगिरीला सन्मान मिळतोच नाट्यकलेने समृद्ध व्यक्तिमत्व घडते. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आजचे आघाडीचे अभिनेते, अभिनेत्री ,व्यासायिक आहेत. असे मनोगत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर इथल्या सहाय्यक प्राध्यापक ममता बोल्ली यांनी व्यक्त केले. त्या संगमेश्वर कॉलेज आयोजित सांस्कृतिक विभागातल्या सत्कार समारंभ आणि व्याख्यान प्रसंगी बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा , उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी, सांस्कृतिक विभागप्रमुख दादासाहेब खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी दादासाहेब खांडेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार नंतर वेस्ट झोन युवा महोत्सवातील यशस्वी क...