इंग्रजीप्रमाणे सॉफ्ट स्किल्स अंगीकारणेही महत्त्वाचे आहे - डॉ.सतीश लकडे
संगमेश्वर महाविद्यालयात इंग्रजी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन सोलापूर प्रतिनिधी - 'सॉफ्ट स्किल्स सेल्फ मोटिवेशन' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले जीवनात प्रगती साधायची असेल तर इंग्रजी भाषेतील प्रभुत्व ज्याप्रमाणे महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे सॉफ्ट स्किल्स अंगीकारणेही महत्त्वाचे आहे.''असे प्रतिपादन डॉ.सतीश लकडे ( एच.आर.,एन्जिग्मा सॉफ्टवेअर, पुणे ) यांनी केले.ते संगमेश्वर महाविद्यालयातील इंग्रजी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे या नात्याने त्यांच्या हस्ते पार पडले.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी हे होते. सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ.उषा जमादार यांनी केले.प्रा.डॉ. रेश्मा जावळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. नंदा साठे यांनी मनोगत व्यक्त केले. तर प्रा.डॉ. सुहास पुजारी यांनी अध्यक्षीय भाषण केले. प्रा.डॉ. सतीश लकडे यांनी सॉफ्ट स्किल्सची व्याख्या करून त्यांनी सॉफ्ट स्किल्स आणि हार्ड स्किल्स यामधील फरक स्पष्ट केला तसेच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या आधारे मनोरंजक ...