संगमेश्वर कॉलेज भूगोल विभागाच्या माजी विद्यार्थी मेळा उत्साहात
संगमेश्वरच्या भूगोल विभाग माजी विद्यार्थ्यांचा मेळा उत्साहात सोलापूर (रविवार दिनांक १६ एप्रिल) भूगोल विभागातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. संगमेश्वर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी रविवारी १६ एप्रिलला कॉलेजच्या प्रांगणात जमले होते.१९९५ पासून विविध क्षेत्रात कार्यरत असलेले शेतकरी, प्राध्यापक, शिक्षक, उद्योजक, अभ्यासक, गृहिणी, प्रशासक, पोलीस प्रशासन, वित्त व वितरण विभाग या बहुविध क्षेत्रात कार्यरत विद्यार्थी एकत्र आले होते. प्रत्येकाने आपल्या आठवणीने उजाळा देत संगमेश्वर कॉलेजच्या संस्कारात मोठे झालो असल्याची कृतज्ञ भावना व्यक्त केली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा भूगोल असोसिएशन तर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित निवृत्त प्राचार्य के. एम. जमादार प्रा.डॉ. नेहा चक्रदेव, प्रा. मधुरा वडापूरकर, माऊली महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य दत्तात्रय हरवाळकर यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. मेळाव्यास संगमेश्वर गीताने प्रारंभ झाला. प्रारंभी विद्यमान भूगोल विभाग प्रमुख राजकुमार मोहोरकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत ...