पोस्ट्स

एप्रिल १८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'आला उन्हाळा, तब्येत सांभाळा' - संगमेश्वरच्या विद्यार्थ्यांचे प्रबोधन

इमेज
संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग कला शाखेचा उपक्रम  सोलापूर ( दिनांक १९ एप्रिल )  '' वाढत्या उन्हाच्या तीव्रतेचा धोका ओळखून तापमानाचा पारा सध्या राज्यभर ४० च्या वरती जात असल्याने संगमेश्वर कॉलेज स्वायत्त कनिष्ठ विभाग कला शाखेच्या वतीने प्रबोधन करत उन्हाळ्यात काळजी घेण्यासाठी टोपी वापरा, पुरेसे पाणी प्या, पाण्याची बाटली जवळ ठेवा  अश्या आशयाचे  फलक दर्शवून प्रबोधन केले. 'आला उन्हाळा, तब्येत सांभाळा ' अशा घोषणा  दिल्या. यामध्ये समृद्धी सावंत , नेहा अय्यर, हेमंत नक्का, आकांक्षा पाठक, श्रेयसी कुंटे,राजश्री बन्ने  यांच्यासह कला शाखेतील विद्यार्थ्यांनी जनतेशी संवाद साधला.                              याप्रसंगी प्राचार्य राजेंद्र देसाई, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, समन्वयक शिवशरण दुलंगे, प्रा.अशोक निम्बर्गी प्रा.शहाजी माने, प्रा.शिवराज पाटील, प्रा. एस. बी. निम्बर्गी, प्रा. डॉ.विठ्ठल अरबाळे, प्रा.  शंकर कोमुलवार ,प्रा. दत्तात्रय गुड्डेवाडी, प्रा. विश्वनाथ कक्कळमेली, प्रा.कोमल कोंडा, प्रा.रश्मी कन्नूरकर,प्रा. प्रकाश कतनळी,  प्रा. हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी कलादालन व वस्तुसंग्रहालय व्हावे ------ धर्मराज काडादी

इमेज
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक धोरणाविषयीच्या तज्ज्ञांची सभा संपन्न सोलापूर (दिनांक १८  एप्रिल ) ''सोलापूरसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी कलादालन व वस्तुसंग्रहालय व्हावे तसेच शालेय स्तरावरील मुलांसाठी राज्यव्यापी चित्रकला स्पर्धा घेऊन त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत''  असे मत धर्मराज काडादी यांनी मांडले. ते काल महाराष्ट्र शासन सांस्कृतिक धोरण विषयक तज्ज्ञ समितीच्या सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये ही सभा संपन्न झाली. या प्रसंगी व्यासपीठावर राज्य शासन सांस्कृतिक धोरण समितीचे सदस्य माजी प्राचार्य चित्रकार जी.एस. माजगावकर (कोल्हापूर) चित्रकार सुनील महाडिक ( मुंबई ) राज्य शासनाचे प्रतिनिधी प्रा. डॉ. गणेश तरतरे, कला व्यवसाय केंद्राचे माजी प्राचार्य गोपाळ डोंगे, प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर,  संगमेश्वर रात्र महाविद्यालय प्राचार्य श्रीनिवास गोठे यांची उपस्थिती होती.                    प्रारंभी प्रा.सचिन गायकवाड यांनी प्रास्ताविक केले या त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासंदर्भात शासनाने गठित केलेल्या समितीचा उद्देश स