पोस्ट्स

जुलै २९, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वर महाविद्यालय संगणक शास्त्र विभागातर्फे वृक्षारोपण

इमेज
सोलापूर प्रतिनिधी ---  सोलापुरातील उन्हाळ्यातील तापमानाची तीव्रता बघता वृक्षारोपणाची गरज ओळखून संगमेश्वर महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला व 100 प्रजातींच्या वृक्षांचे वृक्षारोपण विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून करण्यात आले. संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर व इको नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा विधीसेवा प्राधिकरण सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवडीस सुरुवात झाली आहे. न्यायाधीश निवास परिसर येथील दोन एकर परिसरात ऑक्सिजन पार्क निर्मिती होत आहे इको नेचर क्लबच्या माध्यमातून औषधी वनस्पती उपलब्ध करून देण्यात आले.                          संगमेश्वर महाविद्यालयातील एकूण 200 विद्यार्थी श्रमदान करून या उपक्रमात सहभाग नोंदवला. उद्घाटक जिल्हा न्यायाधीश श्री योगेश राणे व न्यायाधीश एस.पी पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. या ऑक्सिजन पार्कसाठी जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाची टीम श्रमदान करीत आहे येथील सुरक्षा बल यांनी या रोपांच्या संवर्धनांची जबाबदारी घेतली आहे. इको नेचर क्लबचे श्री मनोज देवकर यांनी वृक्षारोपण कृतिशील