संगमेश्वरमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या वतीने अग्निशमन प्रात्यक्षिके
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे डोळे दिपवणारे प्रात्यक्षिक सोलापूर संचार प्रतिनिधी - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल एनटीपीसी शाखेच्या वतीने संगमेश्वर कॉलेजमध्ये अग्निशमन यंत्रणा कशी काम करते आणि आग विझवण्यासाठी आपण कोणकोणत्या खबरदारी घ्याव्यात. या संदर्भात प्रात्यक्षिकाचे आयोजन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या आग प्रतिबंधक विभाग नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन , फताटेवाडी ( एनटीपीसी ) शाखेच्या वतीने करण्यात आले. यामध्ये प्रारंभी फायर इन्स्पेक्टर संतोष एम.अरविंद यांनी प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकात त्यांनी या प्रात्यक्षिक व सरावाचा हेतू स्पष्ट केला.९ महाराष्ट्र एनसीसी बटालियन ,राष्ट्रीय सेवा योजना कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हे प्रात्यक्षिक कॉलेजच्या प्रांगणात सादर करण्यात आले.यामध्ये फायर इन्स्पेक्टर संतोष एम अरविंद, सुमित अतिग्रे, पी. के. वाघ, सौमिक कुमार, विकास मोरे, जे.के. गगराई...