वाचन हीच लेखनाची मूळ प्रेरणा – योगीराज वाघमारे
संगमेश्वरमध्ये ' वाचन प्रेरणा ' भित्तीपत्रिकेचे प्रकाशन सोलापूर: कोणताही लेखक सहजासहजी घडत नाही. त्याला लेखन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. श्रवण, वाचन, भाषण आणि लेखन ही भाषिक कौशल्ये आहेत. चांगले ऐकणे जसे महत्त्वाचे आहे. तसेच चांगले वाचणे सुध्दा महत्वाचे असते. यातूनच लेखन प्रेरणा मिळत असते. कॉलेज जीवनात भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून सुरू झालेले लेखन पुढे लेखक म्हणून घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरते. असे विचार ज्येष्ठ लेखक योगीराज वाघमारे यांनी व्यक्त केले. संगमेश्वर कॉलेजमधील मराठी विभागाच्या वतीने मराठी वाङ्मय मंडळाच्या अंतर्गत वाचन प्रेरणा विशेषांक २०२३ या भित्तीपत्रिकेचा प्रकाशन समारंभ आयोजित केला होता. १५ ऑक्टोबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्र्पती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म्दिवस असून तो वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिनानिमित्त् विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा ही भित्तीपत्रिका तयार केली होती. तिच्या प्रकाशन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगीराज वाघमारे उपस्थित होते. कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र् देसाई यांनी अध्य...