जेईई मेनमध्ये संगमेश्वर कॉलेजचे देवांग देशपांडे, प्रवीण याबाजी अव्वल
जेईई मेनमध्ये संगमेश्वर कॉलेजचे देवांग देशपांडे , प्रवीण याबाजी अव्वल सोलापूर ( दिनांक ७ ) नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( NTA) ने JEE मुख्य सत्र एकचा निकाल जाहीर केला आहे. जेईई मेनमध्ये संगमेश्वर कॉलेजच्या देवांग नितीन देशपांडे (९६ .७०) प्रवीण अनिल याबाजी (९४.५६ ) पर्सेन्टाइल गुण मिळवून कॉलेजमधून अव्वल ठरले. सोमवारी रात्री उशिरा JEE चा निकाल जाहीर झाला. jeemain.nta.nic.in आणि ntaresults.nic.in या दोन अधिकृत वेबसाइटवर JEE मुख्य निकालाच्या लिंक देण्यातआल्या होत्या . ही परीक्षा २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती. NTA ने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार , जानेवारीच्या सत्र परीक्षेसाठी ९ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. यशस्वी विद्यार्थ्यांचा संगमेश्वर कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला.यशस्वी विद्यार्थ्यांचे संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापन समिती सदस्य शरणराज काडादी , प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई , उपप्राचार्य प्रसाद कुंटे , एसआयपी...