पोस्ट्स

जुलै १७, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कला,वाणिज्य आणि विज्ञान क्षेत्रातील संधीचा लाभ घ्या - उपप्राचार्य प्रसाद कुंटे

इमेज
    संगमेश्वर कॉलेजमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांचे  स्वागत  सोलापूर प्रतिनिधी  ''कला,वाणिज्य आणि विज्ञान क्षेत्रातील वैविध्यपूर्ण संधीचा अवश्य लाभ घ्या. त्यासाठी  कठोर मेहनत, सातत्यपूर्ण परिश्रम पूर्वक नियोजनाची गरज आहे.'' असे प्रतिपादन संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रसाद कुंटे यांनी केलं. कला,वाणिज्य आणि विज्ञान या तीनही विभागाच्या इयत्ता अकरावीच्या  स्वागत समारंभ आणि अभिभाषण प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी  कला समन्वयक - शिवशरण दुलंगे वाणिज्य विभाग समन्वयक - बसय्या हणमगाव,  विज्ञान विभाग समन्वयक - रामराव राठोड, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे आदी उपस्थित होते.   कला शाखेतून करिअर करत असताना  कला, साहित्य, संगीत याबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करत स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आपले करिअर आपण करू शकता.  वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी   या स्पर्धा परीक्षांकडे वळताना, बँकिंग क्षेत्रातील संधीचाही लाभ घ्यावा.  विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आयआयटी, जेईइ, नीट, सीईटी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास समोर ठेवून  परीक्षार्थी आणि ज्ञानार्थी या दोन्ह