इंटरनेटच्या आभासी युगात ऑनलाइन धोक्यांची जाणीव करून घ्या. पोलीस निरीक्षक - एस.एस.गजा
सायबर गुन्हे जागरूक ते विषयी पोलिसांनी साधला तरुणांशी संवाद सोलापूर शहर प्रतिनिधी ''इंटरनेटच्या आभासी जगाला भौगोलिक, आर्थिक, सामाजिक असे कोणत्याही प्रकारचे बंधने नाहीत. हे आपण सारेच अनुभवतो आहोत. मात्र पालक, घरातील प्रौढ व्यक्ती यांनाच 'ऑनलाइन' धोक्यांची व्याप्ती आणि तीव्रता याची जाणीव नसल्याने लहान मुले, विद्यार्थी सहजपणे ऑनलाइन धोक्यांना बळी पडतात. सायबर सुरक्षा या विषयाबाबत काम करताना संपर्कात आलेल्या केसेस आणि अनुभवांवरून ऑनलाइनच्या आभासी जगातील सायबर धोके समोर आणून त्याची माहिती करून देण्याचे काम पोलिसांनी केले आहे.पालकांना, घरातील प्रौढ व्यक्तींना सर्वांत आधी ऑनलाइन धोक्यांची जाणीव करून द्या आणि त्यापासून बचाव कसा करायचा हे शिकवणे ही आता काळाची गरज बनली आहे.'' असे मत कॉलेजेचे माजी विद्यार्थी मा.एस.एस.गजा ( पोलीस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा ) यांनी मांडले. संगणक विज्ञान विभागाने सायबर गुन्हे जागरूकता विषयी अतिथी व्याख्यान आयोजित केले होते त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर ए.ए.नळेगावकर (सहायक पोलीस ...