कर्मयोगीअप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय निसर्ग चित्र स्पर्धा

सोलापूर शहरातील वैविध्यपूर्ण ठिकाण रेखाटले राज्यभरातून आलेल्या चित्रकारांनी सोलापूर दिनांक ९ फेब्रुवारी - कर्मयोगीअप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाच्या वतीने राज्यस्तरीय भव्य निसर्ग चित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कला महाविद्यालयाचे यंदाचे रौप्य महोत्सव असल्याने महाराष्ट्रातील कलावंतांसाठी खुल्या निसर्ग चित्रण स्पर्धेचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील विविध कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोलापूर शहरातील प्रेक्षणीय स्थळांचे चित्रण करून या स्पर्धेमध्ये आपली कला सादर केली. महाराष्ट्रातून आलेल्या सर्व चित्रकारांनी सकाळी ७ ते ८ या वेळेत आपली नावे नोंदवली.त्यानंतर सोलापुरातील कोणत्याही परिसरातील एका ठिकाणाचे चित्रण करावयाचे होते. ज्या त्या ठिकाणासाठी ते रवाना झाले. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत त्यांनी चित्र आणून दिली. त्यानंतर परीक्षकांनी त्या चित्रांचे परीक्षण केलं. ...