पोस्ट्स

डिसेंबर १८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वरच्या विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती

इमेज
 सोलापूर(दिनांक १८ ) संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग कला शाखा समाजशास्त्र विभागाच्या आणि जिल्हा निवडणूक शाखा अंतर्गत उत्तर तहसील कार्यालय यांच्या  वतीने  मतदार जनजागृती अभियानांतर्गत कॉलेज प्रांगणासमोरील मुख्य रस्त्यावरमतदारांना मतदार नाव नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले. हातात 'चला मतदान करूया, देशाची प्रगती करूयात', ' मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो',  ' ना जातीवर ना धर्मावर,  बटन दाबा कार्यावर,' ' मतदानाचा अभियान, लोकशाहीची आहे शान,'  'छोडकर सारे काम, चालू करो मतदान.'  असे फलके घेऊन ऋग्वेद देशमुख, शशांक वाघमारे, रवी तळभंडारे, साक्षी पाटील,  मोहिनी कराडे यांच्यासह विद्यार्थ्यांनी जनतेशी संवाद साधला.  या अभियानासाठी  उपप्राचार्य प्रसाद कुंटे, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, तहसीलदार सैपन नदाफ  यांचे मार्गदर्शन लाभले  यामध्ये कला विभाग समन्वयक शिवशरण दुलंगे, प्रदीप आर्य, हर्षवर्धन पाटील  मतदार नाव नोंदणी अधिकारी,नायब तहसीलदार सुधाकर बंडगर आदी मान्यवर उपस्थित होते.