संगमेश्वरमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या वतीने अग्निशमन प्रात्यक्षिके

 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे डोळे दिपवणारे  प्रात्यक्षिक

सोलापूर संचार प्रतिनिधी -  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल एनटीपीसी शाखेच्या वतीने  संगमेश्वर कॉलेजमध्ये  अग्निशमन यंत्रणा कशी काम करते आणि आग विझवण्यासाठी आपण कोणकोणत्या खबरदारी  घ्याव्यात.  या संदर्भात प्रात्यक्षिकाचे आयोजन  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या  आग प्रतिबंधक विभाग नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन , फताटेवाडी  ( एनटीपीसी )  शाखेच्या वतीने  करण्यात आले. यामध्ये प्रारंभी  फायर इन्स्पेक्टर संतोष एम.अरविंद यांनी  प्रास्ताविक केले.


                   या प्रास्ताविकात त्यांनी या प्रात्यक्षिक व सरावाचा हेतू स्पष्ट केला.९ महाराष्ट्र एनसीसी  बटालियन ,राष्ट्रीय सेवा योजना कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हे प्रात्यक्षिक कॉलेजच्या प्रांगणात सादर करण्यात आले.यामध्ये  फायर इन्स्पेक्टर संतोष एम अरविंद, सुमित अतिग्रे, पी. के. वाघ, सौमिक कुमार,  विकास मोरे, जे.के. गगराई  या सुरक्षा बलातील जवानांचा समावेश होता. या जवानांनी सविस्तर माहिती देत  वेगवेगळ्या प्रकारातील आगी कशा आटोक्यात आणाव्यात या संदर्भात मार्गदर्शन करत  प्रात्यक्षिक सादर केले.  फायर इन्स्पेक्टर संतोष  एम अरविंद आणि पी.के. वाघ यांनी  या संपूर्ण प्रात्यक्षिकाचे धावते वर्णन केले . विद्यार्थ्यांना  या प्रात्यक्षिकामध्ये सामावून घेतले.  

याप्रसंगी मार्गदर्शन करताना  फायर इन्स्पेक्टर संतोष एम अरविंद म्हणाले की , '' प्रथम परिस्थितीचे आकलन करणे आवश्यक असते ,अग्निशामक यंत्र वापरण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी, परिस्थितीचे मूल्यांकन करा आगीचा आकार: फक्त लहान, असलेली आग विझवण्याचा प्रयत्न करा. आग मोठी असल्यास किंवा वेगाने पसरत असल्यास, त्वरित बाहेर पडा आणि आपत्कालीन सेवांना कॉल करा.  निर्वासन मार्ग : तुमच्याकडे स्पष्ट आणि सुरक्षित बाहेर पडण्याचा मार्ग असल्याची खात्री करा. अग्नीला तुमचा बाहेर जाण्याचा मार्ग कधीही अडवू देऊ नका. आगीचा प्रकार : योग्य अग्निशामक यंत्र निवडण्यासाठी आगीचा प्रकार ओळखा.

पी.के. वाघ  म्हणाले की ,'' सुरक्षा खबरदारी  वैयक्तिक सुरक्षा : प्रथम तुमची सुरक्षितता सुनिश्चित करा. शंका असल्यास, बाहेर काढा आणि अग्निशमन कार्य व्यावसायिकांकडे सोडा. इलेक्ट्रिकल फायर्स: इलेक्ट्रिकल फायरसाठी, क्लास सी एक्टिंग्विशर किंवा एकाधिक क्लासेससाठी (A, B, C) लेबल केलेले एक्टिंग्विशर वापरा. स्वयंपाकाची आग: तेल किंवा चरबीचा समावेश असलेल्या स्वयंपाकघरातील आगींसाठी, वर्ग K एक्टिंग्विशर वापरा . पाण्याचा वापर करू नका, कारण त्यामुळे आग पसरू शकते.''

                                            अग्निशामक यंत्र कधी वापरायचे नाही हे सांगताना म्हणाले की, '' मोठ्या आग: मोठ्या किंवा नियंत्रणाबाहेरील आग विझवण्याचा प्रयत्न करू नका. ताबडतोब बाहेर काढा. विषारी धूर: आगीत विषारी धूर निर्माण करणाऱ्या घातक पदार्थांचा समावेश असल्यास, बाहेर काढा आणि आपत्कालीन सेवांना कॉल करा. अशक्त निर्णय: जर तुम्हाला एक्टिंग्विशर प्रभावीपणे वापरण्याच्या तुमच्या क्षमतेबद्दल खात्री नसेल, तर बाहेर काढण्याला प्राधान्य द्या.''

                                      या प्रात्यक्षिक प्रसंगी प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा, उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी , कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, एनसीसी विभागाचे सीईटीओ तुकाराम साळुंखे, कॅप्टन शिल्पा लब्बा,  एनएसएस विभागाचे विश्वनाथ कक्कळमेली, शंकर कोमुलवार,  शिवराज पाटील  शिवशरण दुलंगे, विठ्ठल अरबळे, संतोष पवार, रंगसिद्ध पाटील,   प्रियंका पाटील,  तेजश्री तळे,  रूपाली अंबुलगे,  लीना खमितकर,  प्रशांत शिंपी, प्रकाश कतनाळे ,अशोक निम्बर्गी, दत्तात्रय गुड्डेवाडी ,शिवराज देसाई, डॉ.संघप्रकाश दुड्डे, रश्मी कन्नूरकर यांच्यासह कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील शिक्षक , कर्मचारी, विद्यार्थ्यांचा समावेश होता.


 











                           




अग्निशमन यंत्रणा वेगवेगळे एक्टिंग्विशर कसे वापरावेत या संदर्भातले विशेष माहिती या लिंक वरून आपल्याला मिळेल

https://shorturl.at/FwKoH   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा