संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत


अभ्यासासोबत कॉलेजच्या नावीन्यपूर्ण उपक्रमात सहभागी व्हा.
                                                                                                -  उपप्राचार्य प्रसाद कुंटे

  सोलापूर ( दिनांक १५ जुलै ) " विद्यार्थ्यांनो आजपासून आपले शैक्षणिक सत्र सुरू होत आहे, त्या निमित्ताने कॉलेजकडून आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि मनःपूर्वक शुभेच्छा.  कला ,वाणिज्य आणि विज्ञान शाखेत आपल्या अभ्यासासोबत कॉलेजच्या नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी व्हा आणि आपलं बहुआयामी व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी सज्ज व्हा. '' असे आवाहन उपप्राचार्य  प्रसाद कुंटे यांनी केले. ते कला आणि वाणिज्य शाखेच्या स्वागत समारंभ कार्यक्रमात बोलत होते. मंचावर कला शाखा समन्वयक   शिवशरण दुलंगे, वाणिज्य शाखा समन्वयक बसय्या हणमगाव उपस्थित होते.

  प्रारंभी संगमेश्वर गीत झाले. त्यानंतर विभाग प्रमुखांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकानंतर  उपप्राचार्यांचा सत्कार झाला . त्यानंतर  चित्रफितीच्या माध्यमातून रूपाली पाटील ( वाणिज्य विभाग ) कोमल कोंडा (कला शाखा )यांनी  कॉलेजच्या विविध उपक्रमांची माहिती विभागनिहाय दिली . त्यानंतर विषयनिहाय शिक्षकांनी आपला परिचय करून दिला. परिचयानंतर क्रीडा विभागातल्या ९४ खेळांसह वेगवेगळे क्रीडा प्रकार त्यात आपण कसे सहभागी होऊ शकता.त्याचे भविष्यकालीन मूल्य काय आणि पुढच्या करिअर नोकरीच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा कसा फायदा होतो याविषयी संतोष खेंडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रातिनिधिक स्वरूपात दहावीत  घवघवीत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कॉलेजच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर बारावीतील यशस्वीतांमध्ये  उत्तमा ढगे आणि ऋग्वेद देशमुख  यांचा सत्कार झाला आणि त्यांनी  मनोगत व्यक्त केले.यामध्ये त्यांनी त्यांच्या यशात कॉलेजचा कसा सहभाग होता आणि कुटुंबीयांनी कसे सहकार्य केलं याबद्दल सविस्तर विवेचन केलं.




 त्यानंतर उपप्राचार्यांचे मार्गदर्शन झाले . कला शाखेचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुड्डेवाडी यांनी केले, तर वाणिज्य शाखेचे संगिता म्हमाणे यांनी केले. आभार रश्मी कन्नुरकर आणि वाणिज्य शाखेचे आभार बाबासाहेब सगर यांनी मानले. याप्रसंगी काळ वाणिज्य  विभागातील बहुसंख्य विद्यार्थीवर्ग  उपस्थित होता.



























टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा