शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम
कर्मयोगी अप्पासाहेब यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धांचे बक्षीस वितरण
सोलापूर प्रतिनिधी - '' शालेय जीवनात गणित विज्ञान आणि भाषेबरोबरच सहशालेय उपक्रम महत्त्वाचे असतात. या भाषिक कौशल्यांचा विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक अभ्यास केला. त्यात नैपुण्य मिळवण्यासाठी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन कौशल्य दाखवले तर नक्कीच विद्यार्थ्यांचे करिअर उज्वल होऊ शकते. याचे भान ठेवून पालकांनी त्यांना प्रोत्साहित करावे. महत्त्वाचे म्हणजे आहार संतुलित ठेवावा. साऱ्या आजारांचे मूळ आपले अन्न असल्याने आहार व्यवस्थापन व्यवस्थित केले की नक्कीच सुदृढ मुले सक्षम होतील.सक्षम मुलांचे शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडत असते.'' असे प्रतिपादन प्रसिद्ध सर्जन डॉ. श्रीधर माकम यांनी केले. ते कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीनिमित्त संगमेश्वर पब्लिक स्कूल आणि दैनिक संचार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रंगभरण, चित्रकला, वक्तृत्व, पत्र लेखन, निबंध लेखन या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये बोलत होते. व्यासपीठावर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य शितल काडादी, तारा काडादी, श्रेयस आळंद, प्राचार्य प्रियांका समुद्रे, प्राथमिक विभागाच्या प्रमुख कीर्ती शंकू आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कर्मयोगी अप्पासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रदीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. . त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विजेत्या स्पर्धकांचा गौरव केला.
निकाल - वक्तृत्व स्पर्धा ( गट इयत्ता पाचवी -सहावी) प्रथम क्रमांक -रविकुमार वडेपालली (डी. आर .श्रीराम इंग्लिश स्कूल ) द्वितीय - सार्थक कोनाडे ( सिद्धेश्वर हायस्कूल ) तृतीय - शर्वरी अमोल मोहरे (श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला) गट इयत्ता सातवी - आठवी ---- प्रथम समृद्धी आलदर (एस.आर.चंडक इंग्लिश हायस्कूल) द्वितीय - अखिलेश कोरे ( सिद्धेश्वर हायस्कूल ) तृतीय- यशवंत योगनाथ सुरवसे (सिद्धेश्वर हायस्कूल) गट नववी -दहावी प्रथम - गौरी कालवडे (शरद चंद्र पवार प्रशाला) द्वितीय - नील अमर जेऊरकर (संगमेश्वर पब्लिक स्कूल ) तृतीय - जान्हवी नितीन जाधव ( मॉडर्न हायस्कूल )
पत्रलेखन- गट इयत्ता पाचवी - सहावी , प्रथम -मधुरा पेंढारकर (श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल ) द्वितीय - अभिनय भगत (श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला ) तृतीय - सिमरन पटेल (संगमेश्वर पब्लिक स्कूल ) गट इयत्ता सातवी -आठवी, प्रथम - श्राविका नागनाथ सामल (डी.. आर श्रीराम इंग्लिश स्कूल ) द्वितीय - स्वरांजली बनसोडे (संगमेश्वर पब्लिक स्कूल) तृतीय - श्रेयस देशतवार ( संगमेश्वर पब्लिक स्कूल)
गट नववी - दहावी, प्रथम - दिग्विजय शक्तीसागर सुरवसे (श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला) द्वितीय -अथर्व कुंभार ( शरदचंद्र पवार प्रशाला ) तृतीय - ज्योतिरादित्य प्रभाकर कदम (सुयश सेंट्रल स्कूल) निबंध लेखन गट पाचवी -सहावी , प्रथम - आर्यन विजयकुमार (सिद्धेश्वर हायस्कूल) द्वितीय - अंजली विजयराज माळगे ( सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल) तृतीय शर्वरी सुनील स्वामी (श्री सिद्धेश्वर मॉन्टेसरी स्कूल) गट सातवी -आठवी , प्रथम - सानवी बसवेश्वर जंगम ( श्री सिद्धेश्वर मॉन्टेसरी स्कूल) द्वितीय - पवन वडार (स्कूल ) तृतीय - दक्ष अडवाणी ( संगमेश्वर पब्लिक स्कूल ) गट नववी- दहावी, प्रथम - जय दीपक जन्मले (सिद्धेश्वर हायस्कूल ) द्वितीय - किरण सुनील जाधव (सुयश सेंट्रल स्कूल) तृतीय - रत्नदीप मेलगेरी ( शरदचंद्र पवार प्रशाला )
रंगभरण व चित्रकला स्पर्धा - गट छोटा गट आणि मोठा गट---- प्रथम- मान्यता मारुती गाठ ( संगमेश्वर पब्लिक स्कूल) द्वितीय - लाल तनिष राहुल ( संगमेश्वर पब्लिक स्कूल ) तृतीय - संस्कृती प्रदीप काटवे ( विष्णुपंत कोठे मेमोरियल स्कूल ) गट इयत्ता पहिली - दुसरी--- प्रथम - समीक्षा परमेश्वर मंडलिक ( जनता विद्यालय ) द्वितीय - अवनी साळुंखे ( सिद्धेश्वर प्रायमरी स्कूल) तृतीय - सई सत्यजित निकम ( संगमेश्वर पब्लिक स्कूल ) गट नववी- दहावी, प्रथम - समाधी मुलनी ( संगमेश्वर पब्लिक स्कूल) द्वितीय - प्रांजली अनिल अलादी ( बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल ) तृतीय - सर्वेश श्रेयश आळंद ( संगमेश्वर पब्लिक स्कूल )
विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह आणि अनुक्रमे सातशे, पाचशे, तीनशे अशी रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.या स्पर्धेत एकूण २५० स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सुरज दिंडोरे, अंजली उपासे ,शोभा गोटे ,प्रिती वळसंगे ,ज्योती नेहलानी , निकीता लोमटे अश्विनी कुलकर्णी यांनी परीक्षण केले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. दिपाली करजगीकर ,प्राचार्य संतोष पाटील, शैक्षणिक विभागप्रमुख सुनीश किणगी, वैष्णवी देशपांडे, प्रीती दुलंगे, सांस्कृतिक विभागप्रमुख ज्योती माने यांनी सहकार्य केले. याप्रसंगी शहर आणि जिल्ह्यातील विद्यार्थी, सह-शिक्षक तसेच संगमेश्वर पब्लिक स्कूलचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुप्रिया प्रचंडे यांनी केले तर प्रीती वळसंगे यांनी सर्वांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा