संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के

कला शाखा ६८.५०,वाणिज्य ८३.६७,विज्ञान ९८.१२ 

कला शाखेची संस्कृती सुरवसे कॉलेजमधून सर्वप्रथम

सोलापूर प्रतिनिधी -  दिनांक ( २१ मे  )

येथील संगमेश्वर ज्युनिअर कॉलेज ,सोलापूरचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के  इतका लागला. शाखा निहाय निकालाची टक्केवारी पुढीप्रमाणे  -  कला शाखा ६८.५० वाणिज्य ८३.६७ विज्ञान ९८.१२  टक्के इतका लागला.कला शाखेची संस्कृती पांडुरंग सुरवसे कॉलेजमधून सर्वप्रथम तर वाणिज्य विभागातून ऐश्वर्या मारुती देवकाते  ९१.१७ टक्के घेऊन प्रथम आली.विज्ञान शाखेतून आकांक्षा गिरीश कुलकर्णी (  ८७.१७ ) हिने प्रथम येण्याचा मान मिळवला.


निकाल याप्रमाणे - कला शाखेचा निकाल (६८.५० टक्के) प्रथम -   संस्कृती पांडुरंग सुरवसे ९२.८३  द्वितीय - उत्तमा महादेव ढगे  ९२.६७  तृतीय - नेहा शंकरनारायणा अय्यर  ९२.०० वाणिज्य शाखेचा निकाल (८३.६७ टक्के ) प्रथम - ऐश्वर्या मारुती देवकाते  ९१.१७  द्वितीय -  नावेद मोहम्मद नौशाद मुजावर  ८८.०० तृतीय -  अंकिता अतुल गुमास्ते ८७.५० विज्ञान शाखेचा निकाल (९८.१२ टक्के ) प्रथम -  आकांक्षा गिरीश कुलकर्णी ८७.१७  द्वितीय -   अनिशा मनीष भोसले ८५.३३   तृतीय -   हर्षवर्धन गणेश पंधारकर  ८४.८३   

                        या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी यशस्वी गुणवंत अनिषा भोसले,आकांक्षा कुलकर्णी  सुजित हुईलगोळ,उत्तमा ढगे,ऐश्वर्या देवकाते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लीना भोसले, सिद्धार्थ सर्जे,चनमल्लाप्पा हालोळी या पालकानी देखील आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आईबाबा , कॉलेज आणि आपल्या शिक्षकांना दिले.  यशस्वी विद्यार्थ्यांचे  संगमेश्वर एज्युकेशन  सोसायटीचे चेअरमन  मा. धर्मराज काडादी , प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा ,उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे  , विज्ञान शाखा समन्वक प्रा.विशाल जत्ती, वाणिज्य समन्वयक प्रा. बसय्या हणमगाव यांनी कला शाखा समन्वयक प्रा.शिवशरण दुलंगे  यांच्यासह सर्व विभागातील प्राध्यापकवृंद , कर्मचारी आदींनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गणेश मुडेगावकर यांनी केले तर पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे यांनी सर्वांचे आभार मानले.








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा