क्षेत्रभेटीअंतर्गत नव्या स्टार्टअप चा अनुभव घेतला संगमेश्वर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी


सोलापूर ता. 13 : संगमेश्वर कॉलेजच्या भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी कोठारी पाईप्स, पार्ले जी  कंपनी व बोडके फार्म रोपवाटीकेस भेट देऊन कार्यपद्धतीची माहिती घेतली. क्षेत्रभेट अभ्यास अंतर्गत भूगोल विभागाकडून कोठारी पाईप,  यावली, मोहोळ, पार्ले-जी कंपनी, बोडके कृषी फार्म व रोपवाटिका वडवळ फाटा  यांना भेट देण्यात आली.

 ज्याप्रमाणे सहशालेय उपक्रम असतात त्याप्रमाणे महाविद्यालयीन जीवनामध्ये  क्षेत्रभेटीचा उपक्रम भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांना नेमलेला असतो.  त्यानुसार  शेती, उद्योग, व्यापार, कृषीपूरक व्यवसाय  या क्षेत्रातील  नव उद्योजकांना भेटून  माहिती घेणे. त्यांच्याशी संवाद साधणं  हा उद्देश या क्षेत्रभेटी अंतर्गत असतो. क्षेत्रभेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य  मिळावे  त्यातून विषयाशी निगडित असलेल्या उद्योग आणि नोकरीच्या संधी कोणत्या आहेत याचे आकलन व्हावे हा प्रमुख हेतू या अभ्यासक्रमामागे आहे.

 कोठारी पाईप्स यावली- मोहोळ या कंपनीला दिलेल्या भेटीमध्ये शेतीमधील जलसिंचनाच्या नवनवीन पद्धती याविषयी माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. कोठारी पाईप कंपनीमध्ये कॅलिबर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, असेही कंपनीच्या व्यवस्थापकांनी सांगितले. त्यासाठी मुलांनी कठोर मेहनत करावी व नवनवीन तंत्रज्ञान शिकून घ्यावे, यावर भर दिला. पार्ले जी कंपनीमध्ये पार्लेचे प्रॉडक्ट कसे तयार होतात हे मुलांना पाहण्याची संधी मिळाली. तसेच कंपनीचा इतिहास आणि त्यांनी जगभरामध्ये कशाप्रकारे नाव कमावले याच्या विषयी माहितीपट दाखवून मुलांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर दादासाहेब बोडके नर्सरी व कृषी फार्म या ठिकाणी भेट देऊन वेगवेगळ्या फळभाज्यांची व फळांची रोपे कशी तयार जातात याविषयी माहिती घेण्यात आली. कृषी क्षेत्रात  नवनवीन तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होतो याविषयी मार्गदर्शन केले. नर्सरी क्षेत्र हे  एक नवीन संधी म्हणून विद्यार्थ्यांनी पहावे असेही नर्सरीचे व्यवस्थापक यांनी सांगितले.

या अभ्यास क्षेत्रभेट या उपक्रमामुळे मुलांना स्टार्टअप विषयी माहिती तर मिळालीच त्याचबरोबर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत याविषयी ही माहिती मिळाली. क्षेत्रभेटीअंतर्गत  नव्या स्टार्टअप चा अनुभव संगमेश्वर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतला. प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा,  भूगोल विभागप्रमुख डॉ.राजकुमार मोहळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.प्रकाश कादे डॉ.राहुल साळुंखे प्रा.रिद्धी बुवा, धनंजय बच्छाव यांनी परिश्रम घेतले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा