मसाप सोलापूर आयोजित "श्रावणधारा" जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा संपन्न
कविता हा अभ्यासपूर्ण व गंभीर साहित्यप्रकार : समीर गायकवाड
विद्यार्थ्यांनी आपला आवडता साहित्यप्रकार काव्यलेखनाच्या संदर्भात सर्वप्रथम भरपूर वाचन केले पाहिजे. त्यानंतर त्या कविता समजून घेऊन चिंतन, मनन करून आपल्यामध्ये साहित्य प्रतिभा रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तदनंतर काव्य लेखन हे अधिक चांगले व निश्चितच गुणवत्ता पूर्ण होईल. कविता-काव्यलेखन हा अभ्यासपूर्ण व गंभीर साहित्य प्रकार असून त्यासाठी वाचन व साहित्य व्यासंग असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन उद्घाटक ज्येष्ठ ब्लॉगर लेखक समीर गायकवाड यांनी श्रावणधारा या मसाप आयोजित जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर मसापच्या अध्यक्षा डॉ. श्रुती वडगबाळकर, कार्याध्यक्ष किशोर चंडक, संगमेश्वर महाविद्यालय उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी, कोषाध्यक्ष व युवा विभाग प्रमुख प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर, स्पर्धाप्रमुख प्रा. भीमगोंडा पाटील आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाले. त्यावेळी सरस्वती स्तवन प्रा. श्रुती देवळे यांनी केले. प्रास्ताविकात डॉ. काटीकर यांनी समस्त जिल्ह्याभरातून आलेल्या 45 महाविद्यालयातील सुमारे 200 विद्यार्थी कवींचे स्वागत करताना, मसापची या काव्य स्पर्धेविषयीची भूमिका विशद केली. सद्यस्थितीत विविध साहित्य प्रकारांच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्पर्धेची कमी होत असलेली संख्या याबद्दल खंत व्यक्त करतानाच मसाप सोलापूर शाखेची ही सतत चालणारी काव्य स्पर्धा यंदाच्या पाचव्या वर्षी ही स्पर्धा संगमेश्वर महाविद्यालय येथे मराठी विभागाच्या सहयोगाने संपन्न होत आहे, याबद्दल आनंद व्यक्त करीत संस्थेचे आभार मानले.
मनोगतामध्ये उपप्राचार्य डॉ.सुहास पुजारी यांनी महाविद्यालयात होत असलेल्या यंदाच्या या उपक्रमाचे विषयी आनंद व्यक्त करीत असतानाच एकूणच कविता विशेषतः कविता व युवक या संदर्भातले संबंध व त्यातील साहित्य-सौंदर्य विशद केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. वडगबाळकर यांनी मसापच्या वतीने आयोजित या काव्य स्पर्धेच्या लाभ आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे व आपणही या कविता सादर करीत असताना या स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन केले. तसेच या स्पर्धेमध्ये इतरांना ऐकून आपण स्वतःच्या साहित्य मूल्याचे मोजमाप करून त्याची कमतरता भरून काढण्या दृष्टीने प्रयत्न करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धाप्रमुख प्रा. भीमगोंडा पाटील, आभार प्रदर्शन डॉ. संतोष मडकी तर डॉ धानेश लिगाडे यांनी कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडली.या स्पर्धेचे परीक्षण बदीउजमा बिराजदार, वंदना कुलकर्णी, प्रांजली मोहीकर, कालिदास चवडेकर, नरेंद्र गुंडेली, रामप्रभू माने यांनी केले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक समिती- डॉ. धानेश लिगाडे, डॉ. दामोदर बनसोडे, प्रा. संतोष पवार, डॉ. संतोष मडकी, डॉ. देविदास गुरव, डॉ. सुवर्णा गुंड, डॉ. नेहा तंबाके-जोशी, प्रा. धनाजीआयवळे, प्रा.नवनाथ नाईकवाडी, डॉ. जयश्री मेहता, डॉ. शंभुनाथ गावडे, डॉ. प्रशांत चाबुकस्वार, डॉ. विजय वडेर, डॉ. अभय जाधव, प्रा. चिवडशेट्टी, प्रा.रंगसिध्द कोरे यांनी तर विद्यार्थी समिती- विनय बुरबुरे, तुषार नायर, अक्षय बागेवाडी, शुभम कोरे, सुयश स्वामी, प्रिया शर्मा, राजगोपाल मादगुंडी, अरबाज पठाण, प्रवीण गणपा यांनी विशेष परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा