आंतरराष्ट्रीय योग दिन संगमेश्वर कॉलेजमध्ये उत्साहात


सोलापूर ( दिनांक २१ ) यंदाच्या २०२५ च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे घोषवाक्य ' एक पृथ्वी, एक आरोग्य ' (One Earth, One Health) असे आहे. याचा अर्थ असा की, योगाच्या माध्यमातून संपूर्ण पृथ्वीला आणि लोकांना निरोगी बनवण्यावर लक्ष केंद्रित करणे, असे PIB ने म्हटले आहे.  याला अनुसरून संगमेश्वर महाविद्यालय, रात्र विभाग आणि संगमेश्वर च्या विविध संस्थांच्या माध्यमातून योग प्रात्यक्षिकाचे आयोजन संगमेश्वर महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आलं होतं. यंदाच्या योग दिन उत्साहात साजरा केला.


याकरता कॉलेजच्या जिमखाना विभागाने नियोजन केलं होतं. प्रारंभी प्रा. शरण वांगी यांनी योददिनाचे महत्व विशद केले. प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी उपस्थित रीदमॅटिक योगाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.विद्यार्थ्यांना  शुभेच्छा दिल्या. त्यानंतर योगाचा  प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने पुढच्या महिन्यापासून योगाच्या स्पर्धा शहर आणि परिसरात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर योग गुरु स्नेहल पेंडसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यातून त्यांनी योग जीवनासाठी कसा आवश्यक आहे, हे अधोरेखित केले.त्यांनतर प्रात्यक्षिकास प्रारंभ झाला.यामध्ये दुर्वांकुर योग वर्गाचे विद्यार्थी अमृता गुंफेकर, तेजस्विनी मादगुंडी, नाविण्या कंडेपल्ली, स्वराली शिंगाडे, गार्गीअलगीकर यांनी सहभाग नोंदवला. सदाबहार रीथमॅटिक योगाचे प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवले. त्यानंतर सोलापूर विद्यापीठाच्या योगशिक्षक पदविकेच्या २०२४- २५ च्या विद्यार्थ्यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक यांच्यासमोर योगाचे प्रात्यक्षिक केले आणि योग करवून घेतले. यामध्ये राजेश शहा, तमा कापसे, दिव्या रांका, धीरज हजारे, ऋत्विक कुरले,ऋचा देवस्थळी, शुभदा राठोड, श्रीदेवी कुलकर्णी, स्नेहल आणि तृप्ती यांचा समावेश होता.रीथमॅटिक योगातील सहभागी विद्यार्थिनींचा प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी सत्कार केला आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास गोठे,कनिष्ठ विभाग उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे यांच्यासह जिमखाना विभाग प्रमुख आनंद चव्हाण,प्रा.शरण वांगी, विक्रांत विभुते यांच्यासह प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले 













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के