संगमेश्वर कॉलेज एनसीसी कॅडेट्सची यशस्वी परंपरा कायम
![]() |
सोलापूर प्रतिनिधी - महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर आयोजित सीएटीसी ७०३ व सीएसटीसी ७०४ असे दोन एनसीसी कॅम्प सहस्रार्जुन प्रशाला येथे घेण्यात आले होते. या कॅम्पमधील विविध स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजच्या एनसीसी कॅडेट्सने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यामधील कॅम्पचे प्रतिनिधित्व इरफान तांबोळी, प्रियंका राठोड, दर्शन चिंचोळकर, सौंदर्या पुजारी यांनी केले.
या एनसीसी शिबिरामध्ये मुलांसाठी व्हॉलिबॉल, रस्सीखेच, खो-खो या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांमध्ये (हॉलिबॉल) संगमेश्वर कॉलेजमधील एनसीसी कॅडेट्सना प्रथम क्रमांक मिळाला, तर रस्सीखेच या स्पर्धेमध्ये मुलींमधून संगमेश्वर कॉलेजला प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच खो-खो या स्पर्धे त मुलींमधून संगमेश्वर कॉलेजला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. वैयक्तिक प्रकारामध्ये रायफल शूटिंग स्पर्धेत विवेक पानीभाते प्रथम क्रमांक पटकावला तर मुलींमधून अक्षता धर्मे हिने प्रथम क्रमांक मिळवला. या कॅम्पमधून बेस्ट वॉलेंटियर कॅडेट म्हणून कल्याणी नागठाण या कॅडेटची निवड करण्यात आली.
तसेच याच कॅम्पमधून पुढील थलसेना कॅम्पसाठी फायरिंगमधून वीड्डू पासवान व विवेक पानीभाते यांची निवड झाली व अन्य प्रकारात अथर्व धावडे, मंजूनाथ स्वामी, अनुज चव्हाण या एनसीसी निवड करण्यात आली आहे.
या भरीव कामगिरीबद्दल संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, सचिव ज्योती काडादी, प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, प्रा.डॉ. सुहास पुजारी, प्रा.डॉ. साहेबराव पाटील व एनसीसी विभागाच्या कॅप्टन शिल्पा लब्बा, लेफ्टनंट प्रा. तुकाराम साळुंखे यांनी सर्व कॅडेट्सचे अभिनंदन केले. ९ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल रणधीर सतीश कुमार, लेफ्टनंट कर्नल शरभ बाबर, सुभेदार मेजर सपकोटा प्रदीप कदम, विक्रमजीत सिंग व सर्व एनसीसी पी.आय. स्टाफ यांनी संगमेश्वर कॉलेजच्या एनसीसी कॅडेटचे अभिनंदन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा