एमएचटी - सीइटी परीक्षेत विद्यार्थ्यांचे संगमेश्वर कॉलेजचे यश
सोलापूर प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (MHT-CET) परीक्षेचा निकाल नुकताच लागला.यामध्ये संगमेश्वर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. सायली सुनील पाटील या विद्यार्थिनीने ९७.१५ परसेंटाइल घेऊन या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला, तर अथर्व लिंगराज मरगूर याने ९६.८२ परसेंटाइल घेऊन दुसरा येण्याचा मान मिळवला. ओंकार सुहास वाघमोडे यांनी ९५.६७ परसेंटाइल घेऊन तिसरा येण्याचा मान मिळवला.
निकाल याप्रमाणे - शिवेन हलकुडे (९५ ), चैतन्य सतीश भोसले ( ९४.३४), साई देविदास कांबळे (९२.३८ ), सुवर्णा गणपत हलनुरे ( ९०.३), वैभव संजय पाटील (९०.२५), राधा सचिन चटके ( ८९.८२ ), अमोल रविकांत उपासे (९७ ), महेश साक्षी चिनगुंडे (८५.८४), युवराज साळुंखे (८५.४१) ,आदिती चोपडे (८५.१९,) प्रथमेश अणवेकर ( ८५ ), अक्षता अलकुंटे ( ८४ ), समीक्षा तेली ( ८४) अथर्व वाले (८२.६५), निमीश उपासे (८२.५ ), श्रुती घुले ( ८२ ), ऋषीराज माने (८२ ) सानिया मुजावर ( ८१.९७ ) गंगाधर उडासे (८१.८७), ओम माने ( ८१.६३) , अनिकेत पारवे ( ८१ ), वैभवी पाटील ( ८० ), संजीवनी जाधव ( ८०).
पीसीबी - आफसहजबीन बार्शीकर (९२ ), संजना गवळी (९०), श्रेया मिस्कीन (८९), अर्पिता ओव्हाळ (८८), सिद्धी कोर्चेकर (८८), अर्ष शेख (८६), अवनी आहूजा (८६) ,ओम गायधनकर (८५.५) ,दिव्या भुरके (८५), सिद्धाराम गायकवाड (८१), शिवकन्या कारंडे ( ८०) .
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कॉलेजच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी यशस्वी विद्यार्थी - अवनी अहुजा,श्रेया मिस्कीन एयानी आले मनोगत मांडले. प्रारंभी उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी प्रास्ताविक केले.त्यानंतर प्राचार्यांच्या हस्ते यशस्वी गुणवंतांचा सत्कार झाला.प्र.प्राचार्य ऋतुराज बुवा यांनी समारोपात यशस्वी गुणवंतांचे कौतुक करत संगमेश्वरची ही परंपरा पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.यशस्वी विद्यार्थ्यांचे संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. धर्मराज काडादी , सचिव मा. ज्योती काडादी यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका पाटील यांनी केले तर पर्यवेक्षक डॉ. मल्लिनाथ साखरे यांनी सर्वांचे आभार मानले.
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (MHT-CET) पीसीएम(भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) गटाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ही परीक्षा १९ ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान आणि ५ मे २०२५ रोजी घेण्यात आली होती. परीक्षेत एकूण ४,६४,२६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी ४,२२,६६३ विद्यार्थी उपस्थित होते.
MHT-CET 2025 ही परीक्षा राज्यातील २०७ आणि राज्याबाहेरील १७ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पीसीएम गटासाठी एकूण ४,६४,२६३ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी ४,२२,६६३ उमेदवार प्रत्यक्षात परीक्षेस उपस्थित होते. सोमवार १६ जून रोजी सीईटी सेलने एमएचटी सीईटी पीसीएमचा निकाल जाहीर केला. परीक्षेला उपस्थितीची टक्केवारी ९१.०४% इतकी नोंदवली गेली होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा