संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के


कला शाखा ६९.९०,वाणिज्य ९२.७६, विज्ञान ९७.४०

वाणिज्य शाखेचा ईशान मेरू कॉलेजमधून सर्वप्रथम



सोलापूर प्रतिनिधी -  दिनांक ( ५ मे  )

येथील संगमेश्वर ज्युनिअर कॉलेज ,सोलापूरचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के  इतका लागला. शाखा निहाय निकालाची टक्केवारी पुढीप्रमाणे  -  कला शाखा ६९.९० वाणिज्य ९२.७६ विज्ञान ९७.४० टक्के इतका लागला.वाणिज्य शाखेचा ईशान वैभव मेरू ( ९४.१७)   कॉलेजमधून सर्वप्रथम तर कला विभागातून -  ऋग्वेद राहुल देशमुख ८८.६७  टक्के घेऊन प्रथम आला.विज्ञान शाखेतून ओंकार सुहास वाघमोडे  ८३.६७  याने  प्रथम येण्याचा मान मिळवला.

निकाल याप्रमाणे -  वाणिज्य शाखा -  प्रथम - ईशान वैभव मेरू ( ९४.१७) द्वितीय - तनिष्का मनीष माने  ( ९१.३०) तृतीय - श्वेता दिलीप कत्ते ( ८९.५० )  कला शाखा   -  ऋग्वेद राहुल देशमुख ८८.६७  सृष्टी  नंदकुमार इनामदार ८८.५० रश्मी सुरज फत्तेवाले ८५.०० विज्ञान  शाखा  - प्रथम - ओंकार सुहास वाघमोडे (८३.६७ ) द्वितीय - सायली सुनील पाटील (८३.१७)  तृतीय - अथर्व लिंगराज मरगुर (८१.१७)

                       या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी यशस्वी  विद्यार्थी - साई कांबळे, ओंकार वाघमोडे, स्वरदा मोहोळकर, तनिष्का माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रुती चव्हाण, सृष्टी इनामदार, डॉ.वैभव मेरू, सविता ओव्हाळया पालकानी देखील आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आईबाबा , कॉलेज आणि आपल्या शिक्षकांना दिले.  यशस्वी विद्यार्थ्यांचे  संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन  मा. धर्मराज काडादी ,  सचिव मा. ज्योती काडादी , प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा ,उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवेक्षक  डॉ.मल्लिनाथ साखरे  , विज्ञान शाखा समन्वक प्रा.विशाल जत्ती, वाणिज्य समन्वयक प्रा. बाबासाहेब सगर  यांनी कला शाखा समन्वयक प्रा.शिवशरण दुलंगे  यांच्यासह सर्व विभागातील प्राध्यापकवृंद , कर्मचारी आदींनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गणेश मुडेगावकर यांनी केले तर पर्यवेक्षक डॉ. मल्लिनाथ साखरे यांनी सर्वांचे आभार मानले.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के