पोस्ट्स

नाट्यकलेतून विद्यार्थ्यांचे परिपूर्ण व्यक्तिमत्व घडते - प्रा. ममता बोलली

इमेज
   सांस्कृतिक विभागाच्या वतीने संगमेश्वरमध्ये व्याख्यान सोलापूर दिनांक १७    १४ विद्या आणि ६४  कलापैकी नाट्यकलेच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्व घडतं. म्हणून महाविद्यालयीन जीवनात  सांस्कृतिक विभागांमध्ये जे उपक्रम चालतात त्यात हिरहिरीने सहभागी व्हा.  मनापासून काम करा .उत्तम कामगिरीला सन्मान मिळतोच नाट्यकलेने समृद्ध व्यक्तिमत्व घडते. त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आजचे आघाडीचे अभिनेते, अभिनेत्री ,व्यासायिक आहेत. असे मनोगत  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर इथल्या  सहाय्यक प्राध्यापक ममता बोल्ली  यांनी व्यक्त केले. त्या संगमेश्वर कॉलेज आयोजित सांस्कृतिक विभागातल्या सत्कार समारंभ आणि व्याख्यान प्रसंगी बोलत होत्या.यावेळी  व्यासपीठावर प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा , उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी, सांस्कृतिक विभागप्रमुख दादासाहेब खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.   प्रारंभी दादासाहेब खांडेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार नंतर वेस्ट झोन युवा महोत्सवातील यशस्वी क...

संगमेश्वर कॉलेजमध्ये भूगोल दिन उत्साहात साजरा

इमेज
  सोलापूर : ता. १७ संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) सोलापूर भूगोल विभाग व सोलापूर भूगोल शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना भूगोलाचे महत्त्व समजावे व अध्ययनाची गोडी निर्माण होऊन या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकावेत या उद्देशाने भूगोल दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयातील १६९ भूगोलप्रेमी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.   या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. महादेव खराडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की भूगोल ही सर्व शास्त्रांची जननी असून आपण सर्व तिचे लेकरे आहोत. कॅलिफोर्निया येथील लॉस अँजेल्स येथे लागलेली आग अतिशय दुर्दैवी असून त्यामुळे निसर्गाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे काळाची गरज असून त्यासाठी भूगोल अध्ययन उपयुक्त ठरते. निसर्ग आपले पालनपोषण करून आपला सांभाळ करतो त्याचप्रकारे आपणही निसर्गाची निगा राखायला हवी असे प्रतिपाद...

संगमेश्वर च्या तीन विद्यार्थ्यांची आयसीआयसीआय कंपनीत निवड

इमेज
  सोलापूर दिनांक २०   संगमेश्वर महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह झाले. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स या नामांकित कंपनीने यामध्ये सहभाग नोंदवला होता. महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅम्पस मुलाखतीत तीन विद्यार्थ्यांची ट्रेनिंग सेल्स या पदासाठी निवड करण्यात आली. त्यांना वार्षिक 2   लाख 65 हजार रुपयांचा पॅकेज देण्यात आलं.   आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इन्शुरन्स लाइफ इन्शुरन्सच्या वतीने   मनस्वी मुद्देबिहाळकर व ज्योती बनिया यांनी विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली. या ड्राइव्ह मध्ये दोन राऊंड झाले. गटचर्चा आणि टेक्निकल मुलाखती मधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. वंदना पुरोहित यांनी   दिली.               बी.कॉम. वर्गातील सिद्धेश्वर हंजगी आणि बीबीए मधील ऋतुजा गवळी आणि धनश्री दत्तू या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली. संस्थेच्या सचिव ज्योती कडादी आणि प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी निवडलेल्या विद्यार्थ्यांचे...

संगमेश्वर कॉलेजमध्ये पालक शिक्षक सभा उत्साहात संपन्न

इमेज
सोलापूर दिनांक  - २० जानेवारी २०२५ संगमेश्वर कॉलेजमध्ये कनिष्ठ महाविद्यालय पालक शिक्षक संघाची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रसाद कुंटे  होते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक प्रा.मल्लिनाथ साखरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सौ शुभांगी सुरेश नागणे, विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी दिशिता संगा यांची उपस्थिती होती.   याच सभेमध्ये आरटीओ कार्यालयाचे श्री बनसोडे आणि गावडे यांनी रस्ता सुरक्षा सप्तांतर्गत पालकांना आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीविषयी आणि  स्वतःच्या सुरक्षेविषयी माहिती देऊन प्रतिज्ञा दिली. या सभेचे सभेचे सूत्रसंचालन सायबण्णा निम्बर्गी यांनी केले. तर उपस्थित यांचे आभार सौ संगीता म्हमाणे यांनी मानले. ही सभा व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रा. शिवराज पाटील, प्रा. हर्षवर्धन पाटील, प्रा. विश्वजीत आहेरकर यांचे सहकार्य लाभले. या सभेला बहुसंख्य पालक आणि शिक्षक उपस्थित होते.

क्षेत्रभेटीअंतर्गत नव्या स्टार्टअप चा अनुभव घेतला संगमेश्वर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी

इमेज
सोलापूर ता. 13 : संगमेश्वर कॉलेजच्या भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी कोठारी पाईप्स, पार्ले जी  कंपनी व बोडके फार्म रोपवाटीकेस भेट देऊन कार्यपद्धतीची माहिती घेतली. क्षेत्रभेट अभ्यास अंतर्गत भूगोल विभागाकडून कोठारी पाईप,  यावली, मोहोळ, पार्ले-जी कंपनी, बोडके कृषी फार्म व रोपवाटिका वडवळ फाटा  यांना भेट देण्यात आली.  ज्याप्रमाणे सहशालेय उपक्रम असतात त्याप्रमाणे महाविद्यालयीन जीवनामध्ये  क्षेत्रभेटीचा उपक्रम भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांना नेमलेला असतो.  त्यानुसार  शेती, उद्योग, व्यापार, कृषीपूरक व्यवसाय  या क्षेत्रातील  नव उद्योजकांना भेटून  माहिती घेणे. त्यांच्याशी संवाद साधणं  हा उद्देश या क्षेत्रभेटी अंतर्गत असतो. क्षेत्रभेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य  मिळावे  त्यातून विषयाशी निगडित असलेल्या उद्योग आणि नोकरीच्या संधी कोणत्या आहेत याचे आकलन व्हावे हा प्रमुख हेतू या अभ्यासक्रमामागे आहे.  कोठारी पाईप्स यावली- मोहोळ या कंपनीला दिलेल्या भेटीमध्ये शेतीमधील जलसिंचनाच्या नवनवीन पद्धती याविषयी माहिती वि...

राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत कु.भाग्यश्री आळगी हिचे यश.

इमेज
श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने वालचंद शिक्षण समुहातर्फे  दिनांक ५ जानेवारी रोजी १९ वी राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात राज्यभरातील १४७  स्पर्धक सहभागी झाले होते . महिला सुरक्षा -  चिंता व चिंतन  या विषयावर   संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या कु.भाग्यश्री संगप्पा आळगी हिने  उत्तेजनार्थ पुरस्कार पटकावला. यावेळी वालचंद शिक्षण समुहाचे विश्वस्त मा.ब्रिजेश गांधी , विश्वस्त मा.पराग शहा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपञ व रोख 1000 रुपयाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य डॉ. संतोष कोटी  यांच्यासह प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.कु.भाग्यश्री इ.11वी विज्ञान शाखेत शिकत असून तिला तिला संतोष पवार तिचे वडील संगप्पा आळगी ,अशोक निम्बर्गी,सायबण्णा निम्बर्गी, दत्तात्रय गुड्डेवाडी यांचे मार्गदर्शन लाभले.  तिला संतोष पवार तिचे वडील संगप्पा आळगी ,अशोक निम्बर्गी,सायबण्णा निम्बर्गी, दत्तात्रय गुड्डेवाडीयांचे मार्गदर्शन लाभले.  तिच्या यशाबद्दल अध्यक्ष धर्मराज काडादी ,सचिव  ...

आजच्या स्त्रियांनी सावित्रीबाईंचा आदर्श घ्यावा- डॉ. अंजना गायकवाड

इमेज
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त                       ' वाचन संकल्प महाराष्ट्राचा ' अंतर्गत लेखक वाचक संवाद उपक्रम      एनएसएस व   ग्रंथालय विभाग  च्या वतीने आयोजन  सोलापूर: भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या आहेत. त्यांनी आपल्या विचार कार्यातून समाजासमोर आदर्श निर्माण केलेला आहे. त्यामधील अग्रगण्य नाव म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले होय.  भारतीय स्त्रियांच्या सामाजिक गुलामगिरीचे प्रमुख कारण त्यांचे अज्ञान आहे. ते दूर करण्यासाठी शिक्षण हा एकच पर्याय असून स्त्रियांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य जोतिराव व सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानी केले. याचा आदर्श आजच्या स्त्रियांनी घ्यावा. असे विचार सुप्रसिद्ध निवेदिका व कवयित्री डॉ. अंजना गायकवाड यांनी व्यक्त केले. संगमेश्वर कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम व ग्रंथालय विभाग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित लेखक - वाचक संवाद व क्रांतिज्योती सावित्रीबाई ...