संगमेश्वर कॉलेजमध्ये भूगोल दिन उत्साहात साजरा
सोलापूर : ता. १७ संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) सोलापूर भूगोल विभाग व सोलापूर भूगोल शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना भूगोलाचे महत्त्व समजावे व अध्ययनाची गोडी निर्माण होऊन या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकावेत या उद्देशाने भूगोल दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयातील १६९ भूगोलप्रेमी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. महादेव खराडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की भूगोल ही सर्व शास्त्रांची जननी असून आपण सर्व तिचे लेकरे आहोत. कॅलिफोर्निया येथील लॉस अँजेल्स येथे लागलेली आग अतिशय दुर्दैवी असून त्यामुळे निसर्गाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे काळाची गरज असून त्यासाठी भूगोल अध्ययन उपयुक्त ठरते. निसर्ग आपले पालनपोषण करून आपला सांभाळ करतो त्याचप्रकारे आपणही निसर्गाची निगा राखायला हवी असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. व्ही. सी. दंडे, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा तसेच सोलापूर भूगोल शिक्षक संघाचे सहसचिव डॉ.दिपक देडे, डॉ.नागनाथ धायगुडे, डॉ. दिपक नारायणकर, डॉ.बापू राऊत, डॉ.राहुल परदेशी प्रा. घोंगडे, प्रा.दुड्डे, प्रा.सरवदे , प्रा.बनसोडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ.राजकुमार मोहरकर यांनी तर सूत्रसंचालन डॉ.मंजू संगेपाग यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.शिवाजी मस्के यांनी तर आभार प्रा.शिरीष जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.वैभव इंगळे, डॉ.प्रकाश कादे, डॉ.राहुल साळुंखे, प्रा.रिद्धी बुवा व श्री धनंजय बच्छाव यांनी मोलाचे योगदान दिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा