पोस्ट्स

सप्टेंबर १२, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा अभ्यास काळाची गरज – श्री. दिपक कक्कर

इमेज
संगमेश्वर कॉलेजमध्ये 'हॅंड्स ऑन रोबोटिक्स' विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न सोलापूर : ११ सप्टेंबर २०२५ आधुनिक काळामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाची निर्मिती होत आहे. त्यामध्ये रोबोटिक्स तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाचे ठरतेय. उद्योग, आरोग्य, शेती याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. याचा अंतर्भाव नवीन अभ्यासक्रमात करून विद्यार्थ्यांना याचे प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे. असे विचार प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ, उद्योगपती व झुआरी सिमेंट, सोलापूरचे प्लांट प्रमुख श्री. दिपक कक्कर यांनी मांडले. संगमेश्वर कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक व भौतिकशास्त्र विभाग तसेच सुव्ही इन्स्ट्रुमेंट सोलापूर यांच्या संयुक्त विद्ममाने आयोजित एकदिवसीय राष्टीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील स्कूल ऑफ फिजिकल सायन्स विभागाचे संचालक डॉ. व्ही.बी.पाटील होते. श्री. कक्कर यांनी आपल्या भाषणात रोबोटिक्स तंत्रज्ञानावर विविधांगी विचार मांडले.  विशेषत: त्यांनी विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करण्याचा सल्ला दिला. आज अश...