इयत्ता ११ वीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे संगमेश्वर कॉलेजमध्ये स्वागत

कॉलेजच्या उपक्रमात सहभागी होताना खेळ आणि अभ्यास दोन्ही महत्वाचे - उपप्राचार्य प्रसाद कुंटे सोलापूर ( दिनांक २८ जुलै ) " विद्यार्थ्यांनोआजपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात आपणा सर्वांचे स्वागत कॉलेजची क्रीडा आणि शैक्षणिक परंपरा ही दैदिप्यमान आहे. त्या परंपरेचे आपण सहप्रवासी झाला आहात त्या परंपरेला शोभेल असे कार्य तुमच्या हातून घडो हातून घडो. कला,क्रीडा, साहित्य, संगीत या वैविध्यपूर्ण उपक्रमात नैपुण्य मिळवा. आपले उज्वल भविष्य साकार करण्यासाठी संगमेश्वर मधील विविध व्यासपीठांचा वापर करा.कॉलेजच्या उपक्रमात सहभागी होताना खेळ आणि अभ्यास दोन्ही महत्वाचे आहेत ''असे प्रतिपादन उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी केले. ते कला आणि वाणिज्य शाखेच्या स्वागत समारंभ कार्यक्रमात बोलत होते. मंचावर पर्यवेक्षक डॉ.मल्लिनाथ स...