विद्यार्थ्यांना संशोधनातून स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी - मेहुल पटेल # Alcohol Technology

संगमेश्वरमध्ये अल्कोहोल टेक्नॉलॉजी -प्रमाणपत्र वितरण समारंभ सोलापूर प्रतिनिधी -डिस्टिलरी आणि ब्रुअरी उद्योगात स्पिरिट, दारू, बिअर उत्पादनात तांत्रिक अधिकारी, प्रॉडक्शन मॅनेजर, क्वालिटी कंट्रोल ऑफिसर म्हणून काम करण्याच्या उत्तम संधी आहेत. बायोफ्युअल इंडस्ट्रीमध्ये इथेनॉल, बायोगॅस, ग्रीन फ्युअल्स उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये तंत्रज्ञ व संशोधक म्हणून करिअर करता येते. तर फूड व बेव्हरेज इंडस्ट्रीत सोया सॉस, व्हिनेगर, चीज, योगर्ट अशा फर्मेंटेड उत्पादनांच्या कंपन्यांमध्ये फर्मेंटेशन टेक्नॉलॉजिस्ट पद मिळू शकते.विद्यार्थ्यांसाठी अल्कोहोल टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत,” असे मत वाईल्ड क्राफ्ट बेवरेज प्रा. लि., मुंबई चे संस्थापक मेहुल पटेल यांनी व्यक्त केले. संगमेश्वर कॉलेजच्या अल्कोहोल टेक्नॉलॉजी मधील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्याच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी,शैक्षणिक सल्लागार प्रा.डॉ.प्रमोद पाटील,प्राचार्य ऋतुराज बुवा उपस्थित होते ...