विद्यार्थ्यांनी अनुभवले इन सोलापूर न्यूज चॅनलचे कामकाज

डिजिटलमुळे विद्यार्थ्यांना प्रमाण मराठी शिकायला मिळते - राजेश कुलकर्णी सोलापूर ( दिनांक २५ जुलै ) विविध वेबसाईट्स, अॅप्स आणि व्हिडिओंच्या माध्यमातून त्यांचे भाषेचे ज्ञान वाढते, शब्दसंपत्ती समृद्ध होते आणि लेखनकौशल्य सुधारते.मराठी भाषेतील डिजिटल साधने जसे की शिक्षण अॅप्स, ऑडिओ-वाचन, व्हिडिओ शिकवण्या विद्यार्थ्यांना जड विषय सोप्या पद्धतीने शिकवतात. विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना ही साधने शिक्षण अधिक समजण्याजोगे करतात.मराठी डिजिटल माध्यमांमध्ये अनेकदा लोककथा, बोधकथा, संत साहित्य, इत्यादींचा समावेश असतो, जे मुलांमध्ये नैतिक मूल्ये आणि संस्कार रुजवतात. मराठी माध्यमातून शिकताना विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचा परिचय अधिक चांगल्या प्रकारे होतो. पारंपरिक सण, कथा, इतिहास यांची माहिती डिजिटल माध्यमांमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचते.डिजिटलमुळे विद्यार्थ्यांना प्रमाण मराठी शिकायला मिळते. असे प्रतिपादन ...