‘ राष्ट्रीय अवकाश दिन ’ उत्साहात - पोस्टर प्रदर्शन स्पर्धा संपन्न

विविध क्षेत्रांतील वैज्ञानिक संशोधनामुळे राष्ट्र आत्मनिर्भरतेकडे – प्रा.व्यंकटेश गंभीर सोलापूर (वार्ताहर): भारताच्या अंतराळ संशोधन इतिहासातील सुवर्णक्षणाची नोंद ठेवत २३ ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अवकाश दिन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. २३ ऑगस्ट २०२३ रोजी इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले आणि भारत जगातील पहिला देश ठरला. या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जाणार आहे. संगमेश्वर कॉलेजमध्येही राष्ट्रीय अवकाश दिन उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने पोस्टर प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले होते. “आजच्या युगात विज्ञान आणि तंत्रज्ञान हे कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचे मुख्य साधन आहे. भारतासारख्या विशाल देशाला आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी विविध क्षेत्रांतील वैज्ञानिक संशोधन व त्याचा योग्य वापर अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन प्रा. व्यंकटेश गंभीर यांनी केले. ते विज्ञान अध्ययन व आत्मनिर्भरता या विषयावर आयोजित विशेष संवादात बोलत होते. प्...