कर्मयोगी अप्पासाहेब काडादी जयंतीनिमित्त उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या ११६ व्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा २०२५ चे आयोजन प्रतिवर्षे प्रमाणे यंदा १५ सप्टेंबरला करण्यात आले आहे.संगमेश्वर कॉलेज,स्वायत्त ,दैनिक संचार प्रबोधन मंच आणि कर्मयोगी अप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा कॉलेजमध्ये बी वन,सभागृहात होणार आहे. ही स्पर्धा महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ सर्व शाखांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना खुली असून प्रत्येक महाविद्यालयात वरिष्ठ महाविद्यालयातील दोन व कनिष्ठ महाविद्यालयातील दोन असे एकूण चार स्पर्धेत पाठवता येतील.प्रत्येक स्पर्धकास विषयचिठ्ठी उचलून ऐन वेळेस मिळालेल्या विषयावर आपले वक्तृत्व सादर करावयाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यास पाच मिनिटे बोलण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. प्रत्येक स...