पोस्ट्स

ऑगस्ट १६, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली ग्रंथालय कामकाजाची माहिती

इमेज
   ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनी संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथालय कामकाजाची माहिती करून घेतली. तत्पूर्वी प्रा. डॉ. सुहास पुजारी यांच्या उपस्थितीत ग्रंथालय शास्त्राचेजनक डॉ.एस .आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.        या कार्यक्रमानंतर ग्रंथालय भेटीचे नियोजन मराठी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता अकरावी बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी ग्रंथालयातील  वेगवेगळ्या विभागांची माहिती करून घेतली. याप्रसंगी सहाय्यक ग्रंथपाल संतोष कुलकर्णी यांनी संपूर्ण ग्रंथालयाचे माहिती सविस्तर दिली. या उपक्रमात अशोक निम्बर्गी, सायबण्णा निम्बर्गी, दत्तात्रय गुड्डेवाडी, संतोष पवार उपस्थित होते.

ग्रंथालयातील ग्रंथधन जीवनाचा मार्ग दाखवते - प्रा.डॉ.सुहास पुजारी

इमेज
  भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांचा जन्मदिन  सोलापूर प्रतिनिधी -   '' ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचा खजिना. त्यातील प्रत्येक ग्रंथ हे वाचकाला मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ आहे. धार्मिक, तत्त्वज्ञान, साहित्य, विज्ञान, इतिहास, कला इत्यादी प्रत्येक क्षेत्रातील पुस्तकांमुळे माणूस आपले विचार घडवू शकतो, समस्यांचे निराकरण शोधू शकतो, तसेच आदर्श जीवन जगण्यासाठी प्रेरणा घेऊ शकतो. ग्रंथालयातील ग्रंथधन माणसाला अंधारातून प्रकाशाकडे नेते, चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणते. त्यामुळे ग्रंथालय हे केवळ शिक्षणापुरतेच नव्हे तर सद्विचार, सद्गुण आणि संस्कारांचेही केंद्र आहे. विद्यार्थ्याला अभ्यासासाठी संदर्भग्रंथ वाचून करिअरचा योग्य मार्ग सापडतो.साहित्य वाचून मनुष्य संवेदनशील, विचारशील व सुसंस्कृत होतो.चरित्रग्रंथ वाचून जीवनातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळते.म्हणूनच, ग्रंथालयातील ग्रंथधन हे केवळ माहितीचा साठा नसून मानवाच्या जीवनप्रवासाला दिशा दाखवणारे मार्गदर्शक आहे.''  असे मौलिक विचार कला विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. सुहास पुजारी यांनी व्यक्त केले. ते भा...