जागतिक चॉकलेट दिनानिमित्त ‘ मेक अँड ट्रेड ’ व पोस्टर सादरीकरण स्पर्धा

सोलापूर प्रतिनिधी- जागतिक चॉकलेट दिनानिमित्त संगमेश्वर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे ‘मेक अँड ट्रेड’ आणि ‘पोस्टर प्रेसेंटेशन’ या दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्य आणि सर्जनशीलता वृद्धिंगत व्हावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन ‘भकालो फ्रुट्स, सोलापूर’चे संचालक श्री. धीरेनबाई गडा यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रमुख उपस्थितीत श्री. वर्धिनी संस्थेचे चन्नवीर बंकुर व पार्थ तेरकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. पी. बुवा, उपप्राचार्य डॉ. वी. के. पुरोहित, तसेच वाणिज्य मंडळ समन्वयक डॉ. आर. एम. खिलारे यांचा समावेश होता. यावेळी प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धीरेनबाई गडा यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशील उपक्रमांचे आणि चॉकलेट निर्मितीतील नवकल्पनांचे कौतुक करत महाविद्यालयाच्या उपक्रमशीलतेचे अभिनंदन केले. ‘मेक अँड ट्रेड’ स्पर्धेसाठी 20 संघ सहभागी झाले, तर ‘पोस्टर प्रेसेंटेशन’साठी 30 संघ सहभागी झाले. एकूण 140 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘मेक अँड ट्रेड’ मध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः...