संगमेश्वर च्या तीन विद्यार्थ्यांची आयसीआयसीआय कंपनीत निवड
सोलापूर दिनांक २०
संगमेश्वर महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट
ड्राईव्ह झाले. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स या नामांकित कंपनीने
यामध्ये सहभाग नोंदवला होता. महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या वतीने घेण्यात
आलेल्या कॅम्पस मुलाखतीत तीन विद्यार्थ्यांची ट्रेनिंग सेल्स या पदासाठी निवड
करण्यात आली. त्यांना वार्षिक 2
लाख 65 हजार रुपयांचा पॅकेज देण्यात आलं. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इन्शुरन्स लाइफ
इन्शुरन्सच्या वतीने मनस्वी मुद्देबिहाळकर
व ज्योती बनिया यांनी विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली. या ड्राइव्ह मध्ये दोन राऊंड
झाले. गटचर्चा आणि टेक्निकल मुलाखती मधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली
असल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. वंदना पुरोहित
यांनी दिली.
बी.कॉम. वर्गातील सिद्धेश्वर हंजगी आणि बीबीए
मधील ऋतुजा गवळी आणि धनश्री दत्तू या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली. संस्थेच्या
सचिव ज्योती कडादी आणि प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी निवडलेल्या
विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या प्लेसमेंट सेलसाठी प्रा. चेतन धुळखेडकर, प्रा.
बसवराज हगरगुंडगी आणि प्रा. वनिता शिवशरण यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा