भाषा आणि साहित्याला मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान प्रा.डॉ.शिवाजीराव देशमुख

संगमेश्वर कॉलेजमध्ये मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन सोलापूर प्रतिनिधी '' भाषा आणि साहित्याला मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान असते साहित्यातून सामाजिक संदर्भ अभिव्यक्त होतात.भाषा ही माणसाच्या विचारांची, भावना व्यक्त करण्याची प्रमुख साधने आहे. एखादी कल्पना, भावना, मत इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषा आवश्यक असते.साहित्य हे समाजाच्या संस्कृतीचे, परंपरांचे आणि इतिहासाचे प्रतिबिंब असते. एका भाषेतील साहित्य त्या समाजाच्या जीवनपद्धती, मूल्ये आणि संस्कृतीचे दर्शन घडवते.'' प्रा.डॉ.शिवाजीराव देशमुख यांचे प्रतिपादन ते संगमेश्वर कॉलेजच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा होते. याप्रसंगी उपप्राचार्य तथा मराठी विभागप्रमुख डॉ. सुहास पुजारी, प्रा.डॉ. सारीपुत्र तुपेरे उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधताना डॉ. देशमुख म्हणाले की,''साहित्य माणसाच्या मनात सौंदर्याची जाण निर्माण करते. कविता, कथा, कादंबऱ्या यांतून मानवी अनुभवांचे सखोल आणि सुंदर चित्रण केले जाते, ज्यामुळे वाचक अधिक...