पोस्ट्स

ऑगस्ट २८, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वरचे डॉ.आनंद चव्हाण, संतोष खेंडे, प्रा.शरणबसवेश्वर वांगी सोलापूर विद्यापीठाच्या पहिल्या अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कारांचे मानकरी

इमेज
 सोलापूर विद्यापीठाच्या पहिल्या अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कारांची घोषणा' सोलापूर प्रतिनिधी -- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून यंदाच्या वर्षापासून क्रीडा, शारीरिक शिक्षण, खेळ व व्यायाम या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना अहिल्यादेवी क्रीडा पुरस्कार देण्यात येणार असून पुरस्कार प्राप्त मान्यवरांची घोषणा कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी पत्रकार परिषदेत केली. उत्कृष्ट शारीरिक शिक्षण अध्यापक व संचालक पुरस्काराचे मानकरी संगमेश्वर कॉलेजमधील डॉ. आनंद बाळासाहेब चव्हाण हे ठरले आहेत. उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार संगमेश्वर जुनिअर कॉलेजचे संतोष धर्मा खेडे यांना प्राप्त झाला आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकाचा पुरस्कार जलतरण व डायव्हिंगमपील श्रीकांत गंगाधर शेटे व हँडबॉलमधील शरणबसवेश्वर सिद्धाराम वांगी यांना संयुक्तपणे देण्यात येणार आहे तर अहिल्यादेवी उत्कृष्ट क्रीडा पत्रकारितेचा पुरस्कार दैनिक तरुण भारतचे वृत्तसंपादक अजितकुमार बापूराव संगवे यांना जाहीर झाल्याचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले.  मानपत्र, सन्मानचिन्ह, अहिल्यादेवींची मूर्ती असे या पुरस्...