कंपनी सेक्रेटरी या क्षेत्रात उत्तम करिअर -सीए अतुल कुलकर्णी

माझं करिअर अंतर्गत - करिअर इन सीएस हा कार्यक्रम सोलापूर प्रतिनिधी - '' आजच्या आधुनिक काळात शिक्षण व व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये कंपनी सेक्रेटरी (CS) हे क्षेत्र अत्यंत प्रतिष्ठेचे व जबाबदारीचे मानले जाते. कंपनी सेक्रेटरी हा एखाद्या कंपनीसाठी कायदेशीर मार्गदर्शक व सल्लागार म्हणून काम करतो.कंपनी सेक्रेटरी कोर्स The Institute of Company Secretaries of India (ICSI) मार्फत चालवला जातो. या कोर्ससाठी प्रथम CSEET परीक्षा, त्यानंतर Executive व Professional या टप्प्यांतून विद्यार्थी प्रगती करतो. तसेच आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केल्यावर तो प्रमाणित कंपनी सेक्रेटरी होऊ शकतो.कंपनी सेक्रेटरी या क्षेत्रात उत्तम करिअर आहे.'' असे प्रतिपादन सीए अतुल कुलकर्णी यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेज आयोजित माझं करिअर अंतर्गत करिअर इन सीएसया कार्यक्रमात बोलत होते. मार्गदर्शक सीए अतुल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना ' कंपनी सेक्रेटरी ' बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले ते पुढे म्हणाले ,'' कंपनी सेक्रेटरीची मुख्य जबाबदारी म्हणजे कंपनीने कायदे, नियम व सरकारी अटींचे पालन करणे, ...