पोस्ट्स

प्रबोधन कट्ट्याच्या वतीने ' लाच लुचपत प्रतिबंध ' या विषयावर प्रबोधन

इमेज
लाचमुक्त समाज — देशाचा सन्मान     अशा घोषणांनी  विद्यार्थ्यांनी केली जनजागृती सोलापूर प्रतिनिधी- लाच घेणे म्हणजे देशघात, प्रामाणिकपणा हाच खरा धर्म ! ,लाचमुक्त भारत, उज्ज्वल भवितव्य !, प्रामाणिकपणानेच मिळते खरे समाधान.,लाच नको, विकास हवा! भ्रष्टाचाराला नकार, प्रामाणिकतेला स्वीकार!  लाच देऊ नका, लाच घेऊ नका., लाचमुक्त समाज — देशाचा सन्मान!,  इमानदारी हाच खरा ठेवा.  अशा घोषणांनी विद्यार्थ्यांच्या हातातल्या फलकांनी सात रस्त्याच्या परिसरातील संगमेश्वर कॉलेजच्या समोरील गर्दीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रबोधन केले.' प्रबोधन कट्टा ' या उपक्रमांतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर शाखा आणि संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही जनजागृती करण्यात आली.लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर उपाधीक्षक प्रशांत चौगुले, पो.कॉ. सचिन राठोड ,पो.कॉ. गजानन किणगी, पो.कॉ.अक्षय श्रीराम, पो.ह. राहुल गायकवाड,याप्रसंगी  कॉलेजचे .' प्रबोधन कट्टा ' या उपक्रम समन्वयक हर्षवर्धन पाटील, प्रदीप आर्य, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.     ...

तरुणांनी तणावमुक्त जीवनशैलीचा अंगीकार करावा- डॉ. प्रसन्न खटावकर

इमेज
  संगमेश्वर महाविद्यालयात ' आरोग्यम् क्लब ' चा शुभारंभ सोलापूर (प्रतिनिधी) –१८/८/२०२५.  संगमेश्वर महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागृती वाढावी यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'आरोग्यम क्लब' चे  उदघाट्न  सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रसन्न खटावकर  यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.  कार्यक्रमात डॉ. खटावकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक व शारीरिक आरोग्य ही काळाची गरज आहे. तरुणांमध्ये वाढत चाललेल्या आरोग्याच्या समस्या गंभीर बनत आहेत. यावरील एकमेव उपाय म्हणजे तरुणांनी तणावमुक्त जीवनशैली स्वीकार करणे गरजेचे आहे. याबरोबरच नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक विचारसरणी यांचा अंगीकार केला पाहिजे.”त्यांनी पुढे सांगितले की, “आरोग्य चांगले असल्यास यश आपोआपच मिळते. त्यामुळे अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयीची जाणीव वाढविणे अत्यंत स्तुत्य आहे.” या प्रसंगी आरोग्यम क्लबचे पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कार डॉ. खटावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये अध्यक्षा -मिस रेशम खान, उप...

ग्रंथ,वाचन,रोजगारावरील प्रश्नांवरून उलगडले ग्रंथालय विश्व

इमेज
हिंदी कनिष्ठ विभागाचा उपक्रम, विद्यार्थीच बनले मुलाखतकार सोलापूर प्रतिनिधी  ग्रंथ वाचन आणि रोजगारावरील विविध प्रश्न विचारून विद्यार्थ्यांनी ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल यांच्या माध्यमातून ग्रंथालय विश्व जाणून घेतले. निमित्त होते संगमेश्वर कॉलेजच्या हिंदी कनिष्ठ विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ' हिंदी और रोजगार '  या विषयावरील मुलाखतीच्या कार्यक्रमाचे.कॉलेजच्या  ग्रंथालयाच्या इमारतीत हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रथम संगमेश्वरगीताने या कार्यक्रमास प्रारंभ झाला.उपस्थित मान्यवरांचे शब्द सुमनाने सूत्रसंचालक सादिया शेख हिने स्वागत केले.  प्रज्ञा वाघमारे या विद्यार्थिनीने  या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.प्रास्ताविकानंतर सानियाने सर्व सूत्रे हाती घेत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी निमंत्रित केले.     अनुष्का वाघमारे,प्रज्ञा वाघमारे, भाग्यश्री पटवर्धन, भाग्यश्री परदेशी,संदीप आंबेवाले, अथर्व मगदूम, अनुष्का पोळ, मिसबाह शेख,मोहिनी अडकी,गायत्री बुद्धीनी या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. यामध्ये ग्रंथालयाचे कामकाज , ग्रंथालयातून मिळणारी पुस्तके, ...

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला वाणिज्य शाखेच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन

इमेज
सोलापूर प्रतिनिधी -  भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देऊन त्यांच्यातील वाणिज्य व्यवहाराचे ज्ञान वाढीस लागावे. आधुनिक तंत्राची स्थित्यंतरे कोणती ? या बाबी समजावून घेत असताना बँकिंग प्रणाली पैशाचा पैशाचे महत्व, अर्थकारण, त्यावरील अवलंबित असलेले समाजातील घटक असे विषय घेऊन अभिनव रांगोळी स्पर्धेचे आयोजन वरिष्ठ विभागाच्या वाणिज्य शाखेने केले होते. यामध्ये पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मुलींसोबत सोबत विद्यार्थ्यांनी देखील सुबक अशी रांगोळी रेखाटली होती.यामध्ये सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमातील कंगोऱ्यांसह, वाणिज्य शाखेतील व्यावहारिक बदल दाखवण्यात आले, त्यात डिजिटल पे , फोन पे यापासून डिजिटल व्यवहार कसा केला जातो .अर्थकारण ,समाजकारण, भारतीय शेती यांची सांगड घालून ही रांगोळी चित्रे रेखाटण्यात आली होती.दालनाचे उद्घाटन उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास पुजारी यांचे हस्ते झाले.प्रा. डॉ.वंदना पुरोहित, प्रा.डॉ. राजकुमार खिलारे यांच्यासह वाणिज्य शाखेतील प्राध्यापक उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाच...