तरुणांनी तणावमुक्त जीवनशैलीचा अंगीकार करावा- डॉ. प्रसन्न खटावकर

 


संगमेश्वर महाविद्यालयात ' आरोग्यम् क्लब ' चा शुभारंभ

सोलापूर (प्रतिनिधी) –१८/८/२०२५. 

संगमेश्वर महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागृती वाढावी यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'आरोग्यम क्लब' चे  उदघाट्न  सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रसन्न खटावकर  यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. कार्यक्रमात डॉ. खटावकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक व शारीरिक आरोग्य ही काळाची गरज आहे. तरुणांमध्ये वाढत चाललेल्या आरोग्याच्या समस्या गंभीर बनत आहेत. यावरील एकमेव उपाय म्हणजे तरुणांनी तणावमुक्त जीवनशैली स्वीकार करणे गरजेचे आहे. याबरोबरच नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक विचारसरणी यांचा अंगीकार केला पाहिजे.”त्यांनी पुढे सांगितले की, “आरोग्य चांगले असल्यास यश आपोआपच मिळते. त्यामुळे अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयीची जाणीव वाढविणे अत्यंत स्तुत्य आहे.”

या प्रसंगी आरोग्यम क्लबचे पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कार डॉ. खटावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये अध्यक्षा -मिस रेशम खान, उपाध्यक्षा - मिस मुसेबा पटेल,  सचिव- मिस इयाना डिसोझा, सदस्य -अस्मित गिराम, अथर्व जवंजळ, आदित्य झिंगाडे, अभिषेक भारती, आशिष पतंगे या विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश आहे. 

या उपक्रमाला श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या सचिवा प्रा.ज्योती काडादी आणि प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन क्लबचे अध्यक्ष प्रा. डॉ. अर्जुन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.रोहिणी अन्यापनावर व प्रा.मयूर धवन यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के