प्रबोधन कट्ट्याच्या वतीने ' लाच लुचपत प्रतिबंध ' या विषयावर प्रबोधन
लाचमुक्त समाज — देशाचा सन्मान अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी केली जनजागृती
सोलापूर प्रतिनिधी-
लाच घेणे म्हणजे देशघात, प्रामाणिकपणा हाच खरा धर्म ! ,लाचमुक्त भारत, उज्ज्वल भवितव्य !, प्रामाणिकपणानेच मिळते खरे समाधान.,लाच नको, विकास हवा! भ्रष्टाचाराला नकार, प्रामाणिकतेला स्वीकार! लाच देऊ नका, लाच घेऊ नका., लाचमुक्त समाज — देशाचा सन्मान!, इमानदारी हाच खरा ठेवा. अशा घोषणांनी विद्यार्थ्यांच्या हातातल्या फलकांनी सात रस्त्याच्या परिसरातील संगमेश्वर कॉलेजच्या समोरील गर्दीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रबोधन केले.' प्रबोधन कट्टा ' या उपक्रमांतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर शाखा आणि संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही जनजागृती करण्यात आली.लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर उपाधीक्षक प्रशांत चौगुले, पो.कॉ. सचिन राठोड ,पो.कॉ. गजानन किणगी, पो.कॉ.अक्षय श्रीराम, पो.ह. राहुल गायकवाड,याप्रसंगी कॉलेजचे .' प्रबोधन कट्टा ' या उपक्रम समन्वयक हर्षवर्धन पाटील, प्रदीप आर्य, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रशांत चौगुले म्हणाले की,'' लाचलुचपत हा फक्त एक गुन्हा नाही, तर समाजाच्या प्रगतीला रोखणारा मोठा अडसर आहे. एखादा सामान्य माणूस आपल्या हक्कासाठी कार्यालयात गेला, आणि त्याला हक्काची सेवा मिळण्याऐवजी लाच मागितली गेली, तर त्याचे मनोबल खचते. यामुळे प्रामाणिक व्यक्ती निराश होतो आणि भ्रष्ट माणूस बळावतो.आपल्या देशात भ्रष्टाचार आणि लाचलुचपत यामुळे अनेक योजना राबवल्या जात नाहीत, शेतकऱ्याला योग्य मदत मिळत नाही, विद्यार्थ्यांना संधी मिळत नाहीत, सामान्य नागरिकाला न्याय मिळत नाही. "लाच देणारा व घेणारा, दोघेही गुन्हेगार आहेत" हे लक्षात ठेवले पाहिजे.
आपण सर्वांनी ठामपणे ठरवले पाहिजे की,"लाच देणार नाही आणि घेणार नाही."आपले काम प्रामाणिकपणे करू.प्रामाणिक अधिकाऱ्यांना पाठबळ देऊ. चुकीच्या मार्गाने लाभ घेण्याचा मोह टाळू.लाचलुचपत रोखली, तरच समाजात पारदर्शकता, विश्वास आणि प्रामाणिकपणा निर्माण होईल. आपला भारत देश खऱ्या अर्थाने प्रगतीच्या मार्गावर जाईल.''
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा